लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी

By : Polticalface Team ,05-08-2024

लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी

लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्त भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. .श्रावण महिना सुरू होताच लिंपणगावमध्ये एक प्रकारचे भक्तीमय वातावरण तयार होत असते. त्यामध्ये मंगळवारी 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत गावात भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या कालावधीत गावच्या सप्ताह मंडळाने राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने आयोजित केले आहेत. एक आठवडाभर अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त गावात पंढरीचे स्वरूप निर्माण होत असते. दरम्यान लिंपणगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज हे भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. गावचे ग्रामदैवत हे काष्टी श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गावर पुरातन कालीन हेमाडपंती मंदिर आहे. श्रावण महिन्यातच नव्हे तर इतर दिवशीही अनेक भक्तगण दूरवरून नवस्फूर्तीसाठी सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतात. अनेकांना नवस्फूर्तीचा अनुभव देखील मिळाल्याचे भक्तगण सांगतात. 

              प्रामुख्याने पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने सिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविक भक्तांनी श्री सिद्धेश्वर महाराजांना महाभिषेक घालून कौटुंबिक सुख समाधान; सर्वांना निरोगी उदंड आयुष्य प्राप्त होऊ द्या; भरपूर धनधान्य मिळू द्या; सर्वांना सुखात आनंदात ठेवा; यासह सर्वांच्या कौटुंबिक अडचणी दूर होऊ द्या; अशा प्रार्थना करत सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालतात. निश्चितच सिद्धेश्वर महाराज हे भक्तांच्या नवसाला पावणारे ग्रामदैवत असल्याने या देवतावर भाविक भक्तांची अपार श्रद्धा निर्माण झाली आहे. गावचे ग्रामस्थ देखील आनंदी व उत्साही वातावरणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत. या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सिद्धेश्वर मंदिर सभोवताली विविध प्रकारचे आकर्षक अशी गंध फुलांची वृक्ष लागवड करून मंदिरासभोवताली प्रसन्न वातावरण सद्यस्थितीला दिसून येत आहे. त्यामध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी किर्तन सोहळा आयोजित केला असल्याने या कीर्तन सोहळ्यासाठी ग्रामस्थ सप्ताह मडळाने भाविक भक्तांची सुसह्य अशा प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. निश्चितच पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार निमित्त लिंपणगाव मध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. यानिमित्त महाभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ञ सुधीर कुलकर्णी व गुरव दांपत्य परिश्रम घेत आहेत.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी