श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध अनुराधाताई नागवडे

By : Polticalface Team ,08-08-2024

श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध अनुराधाताई नागवडे

लिंपणगाव प्रतिनिधी :

        श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांनी केले. 

          श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन सौ. अनुराधाताई नागवडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस होते. 

         यावेळी सौ. नागवडे म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने जनहिताची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे विविध विकास कामे करणे शक्य होत आहे. नगरसेविका सौ. सीमाताई गोरे व श्री संतोष कोथिंबीर यांच्या विशेष प्रयत्नामुळे प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांच्या विकास निधीमधून आज विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे ही प्रभागाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. यावेळी साळवनदेवी मंदिरासमोर सभा मंडप बांधणे,  वेळू रोड, प्रोफेसर कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, पेडगाव रोड ते वेळू रोड रस्ता (शिवपार्वती सोसा) कॉंक्रिटीकरण करणे, प्रभाग नऊ मध्ये विविध ठिकाणी बाकडे बसविणे इत्यादी कामे प्रामुख्याने घेण्यात आलेली आहेत. 

           यावेळी श्रीगोंदा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती पुष्पगंधा भगत, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्रीमती मीराताई शिंदे , उपनगराध्यक्षा सौ. ज्योती खेडकर, माजी  उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे,  नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके, नगरसेवक तथा गटनेते गणेश भोस, नगरसेवक समीर बोरा, निसार बेपारी, सतीश मखरे सर,सौ. सोनाली ताई घोडके, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शिंदे, तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे, शिवसेना युवा तालुकाप्रमुख निलेश गोरे,  युवा शहर प्रमुख संदीप भोईटे, शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड, सोसायटीचे चेअरमन डॉ. चंद्रकांत कोथिंबिरे, माजी नगरसेवक राजू कोथिंबीर, चेअरमन सुधीर बापू कोथिंबिरे, जय माता ग्रुप चे अध्यक्ष लक्ष्मणराव कोथिंबिरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, युवा उद्योजक पांडुरंग गांजुरे , साळवनदेवी मातेचे पुजारी पाठक परिवार,  सोसायटी संचालक पोपटराव कोथिंबीरे,  राजू शेठ शिंदे,  राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सोनू कोथिंबिरे, समीर कोथिंबीरे, शंकर साळुंखे,  इंजि. वसिम भाई जमादार, शिवसेना तालुका संघटक गणेश गांजुरे तसेच साळवनदेवी रोड, प्रोफेसर कॉलनी, शिवपार्वती सोसायटी मधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 नगरसेविका  सौ. सीमाताई गोरे व  संतोष कोथिंबीर यांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा चांगला विकास केलेला आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी