महादजी शिंदे विद्यालयाच्या स्काऊट-रेंजरने सीमेवरील जवानांना पाठविल्या १५०० राख्या !

By : Polticalface Team ,11-08-2024

महादजी शिंदे विद्यालयाच्या स्काऊट-रेंजरने सीमेवरील जवानांना पाठविल्या १५०० राख्या !

श्रीगोंदा –“भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, म्हणून चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या स्काऊट विभागाच्या रेंजर पथकातील   बहिणींनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या खाऊच्या पैशातून राख्या पाठविल्या. देशाचे रक्षण करणाऱ्या या बांधवांना त्या राख्यांबरोबर बंधू तुझे सलाम, धागा बंधन का, राखी बहन की असे अनोखे संदेशही पाठविण्यात आले आहेत. देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करण्यात सैनिक बांधवांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना कधीही सणासुदीचा आनंद घेता येत नसतो. या राखीपौर्णिमला या छोट्याशा गावातील बहिणींनी सीमेवरील बांधवांसाठी आपल्या खाऊच्या पैशातून सुमारे १५०० राख्या नुकत्याच पाठविण्यात आल्या. त्यांना प्राचार्य दिलीप भूजबळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमामुळे जवानांचे मनोधैर्य नक्कीच उंचावेल. राष्ट्रीय भावनेतून हा कार्यक्रम केला जातो. विद्यार्थ्यांच्यामध्ये जवानांच्या आत्मियता निर्माण होऊन या विद्यार्थ्यांतून उद्याचे राष्ट्रभक्त नागरिक तयार होतील." बहीर्णीच्या या राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांना आमच्या रक्षणासाठी सिमेवर लढताना प्रेरणा मिळणार असल्याची  भावना तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी व्यक्त केली.

भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. सीमेवरील या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या श्रीगोंद्याच्या बहिणींनी १५०० राख्या व ५० शुभेच्छा संदेश सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल नायब तहसीलदार यांनी रेंजर पथकाचे कौतुक केले.या उपक्रमचे नियोजन स्काऊट मास्टर श्री. विकास लोखंडे यांनी केले आहे.

या कार्यक्रमावेळी स्काऊट मास्टर सचिन झगडे, लक्ष्मीकांत खेडकर, संजय मादेवार, चंद्रकला दरेकर,साहेबराव मांडे,ईश्वर नवगिरे,समीर भिसे,संतोष मगर,दत्तात्रय तवले उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष