विधानसभेसाठी मीच सज्ज ; आ संजयमामांसह अन्य इच्छुकांना पाठीशी उभे रहाण्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले खुले आवाहन

By : Polticalface Team ,13-08-2024

विधानसभेसाठी मीच सज्ज ; आ संजयमामांसह अन्य इच्छुकांना पाठीशी उभे रहाण्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले खुले आवाहन करमाळा प्रतिनिधी -करमाळा विधानसभेसाठी तालुक्यातील सर्वाधिक अनुभवी व ज्येष्ठ मीच असून माझ्याच पाठीशी आजी -माजी आमदारांसह सर्व इच्छुक उमेदवारांनी उभे राहावे असे खुले आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले .जगताप घराण्यानेच करमाळा तालुक्याचा महत्वाचा पाणी अन् वीजेचा प्रश्न सोडवला . दुष्काळी सोलापूर जिल्हयातील करमाळा अन् पाण्यावाचून तरमळा अशी ओळख असलेल्या करमाळा तालुक्यातील बाहेर तालुक्यातील लोक मुली द्यायला धजावत नव्हते अशा पाण्याची टंचाई असलेल्या करमाळ्यात कै. नामदेवराव जगताप साहेबांनी १९५२ साली आमदार असताना मांगी तलाव मंजूर करून घेवून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भूमिपूजन केले .तसेच १९६४ साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आग्रह करून उजनी धरणाची पायाभरणी केली . तत्कालिन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी सीनेवर धरण उभा करून मराठवाड्यातील निलंग्याला पाणी नेण्यासाठी सोयीस्कर अशी पोटेगावची साईट निश्चीत केली होती त्यामुळे जामखेड येथील बैलबाजारापर्यंत पाणी जात होते पण त्यावेळी मी स्वतः शिष्टमंडळासह, मंत्री सुशिलकुमार शिंदे तदनंतरचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले शरद पवार आदींना आग्रह करून कोळगाव -आवाटी जवळ ही साईट फायनल करण्यास भाग पाडले व हे सिना - कोळगाव प्रकल्प मंजूर करून घेतला . सीना कोळगाव धरणाचे भूमिपूजन व लोकार्पण हे माझे दोन्हीही माझ्याच आमदारकीच्या टर्ममध्ये झाले .मी अपक्ष आमदार होतो त्यामुळे माझाही शासनात दबदबा होता .माझे पवार साहेब , सुशिलकुमार शिंदे , अजितदादा , पद्मसिंह पाटील आदीं बरोबर खूप जवळीकता होती म्हणून करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सर्वात मोठे २२० केव्ही सबस्टेशन हे मी खास बाब म्हणून राजकिय ताकद वापरून मंजूर करून घेतले . कुकडीचे नियमित आवर्तणे अन् दहिगाव उपसासिंचन योजना , करमाळा शहर पाणीपुरवठा योजना इ . योजना केल्यामुळे तालुक्याचा पाणी अन् वीजेचा प्रश्न कायमचा मिटला . तालुक्यात विविध ठिकाणी शैक्षणिक संस्था उभे केल्या .रीटेवाडी उपसा सिंचन योजनेवर बोलताना ते म्हणाले यावर बोलण्याआधी रामवाडी येथून हजारो कोटी रु .ची ५ टी . एम .सी पाणी क्षमता असलेली आष्टी उपसासिंचन योजना कोणताही गाजावाजा न होता मंजूर पण झाली अन् राशीन पर्यंत त्याची चारी पण झाली आहे आपल्या हक्काच्या तालुक्यातील लोकांसाठी कोणीही याबाबत बोलले नाही . आता उजनी चे ओव्हरफ्लोचे पाणी करमाळा तालुका ओलांडून पर तालुक्यात जाणार आहे .रिटेवाडी उपसा सिंचन योजनेवर बोलणाऱ्यांनी कारखान्याचं वाटोळं केलं आता दूसरा मुद्दाच त्यांच्याकडे जनते समोर जाण्यासाठी नाही म्हणून ते सध्या या योजनेवर बोलत आहेत . सर्व विकास कामे लोकप्रतीनिधी या नात्याने कर्तव्य समजून केली . त्यामुळे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला हे वास्तव असल्याचे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आवाटी येथे २३ केव्ही वीज उपकेंद्र , वलीबाबा संरक्षक भिंत व आवाटी - नेर्ले रस्त्याच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले . यावेळी आमदार संजयमामा शिंदे , जि प सदस्य उद्धवदादा माळी , आदिनाथ चे माजी संचालक चंद्रकात सरडे सुनिलबापू सावंत , नसरुल्ला खान , सरपंच शाबीर खान , सुजीत बागल... आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते . यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांच्या गरजा आता वाढल्या आहेत , त्यामुळे सर्वांच्या मागण्या पूर्ण करणं शक्य नाही परंतू लोकप्रतिनिधींनी विकासात्मक कामे जबाबदारीने व कर्तव्य समजून केली पाहिजेत . नुसताच कोट्यावधी रुपयांचा निधी आणला म्हणून मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुज्ञ जनता लवकर ओळखते म्हणून लोकप्रतिनिंधींनी जनतेला भूलथापा मारून वेडयात काढू नये प्रत्यक्ष विकास कामांवर भर द्यावा . विधानसभा निवडणुकीच्या पाशर्वभूमीवर भाष्य करताना ते म्हणाले की मी पेरणीसाठी सावड केल्या सारखी दोघा -तिघांना मदत करून आमदार केले . मग मी पण जेष्ठ अन् अनुभवी आहे मग त्यांनी मला पेरणीतल्या सावडीच्या परतेफेडी सारखं आमदार होण्यासाठी मदत करावी . मला दोन -तीन पक्षा तून पक्षश्रेष्ठींनी विधानसभा उमेदवारीबाबत निमंत्रित केले आहे त्यावर तालुक्यातील सर्वांशी विचार विनीमय करून योग्य तो निर्णय योग्यवेळी घेवू असे ते म्हणाले . समोर बसलेल्या उपस्थितांनाही त्यांनी विकासकामे प्रत्यक्षपणे करणारा ,योग्य , जो हक्काने काम करु शकेल त्यालाच विधानसभेत पाठवावे असे आवाहन केले . आवाटी गावच्या ग्रामस्थांची अन् आमची तीन पिढयांची नाळ जोडलेली आहे मोठ्या साहेबांपासून माझ्या राजकिय कारकिर्दीतही आवाटी करांनी कायम आशिर्वाद दिले आहेत असा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू खान यांनी केले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष