By : Polticalface Team ,15-08-2024
श्रीगोंदा( प्रतिनिधी)- जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे समाजभिमुख लिखाण हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवदगार समाज भूषण दादासाहेब शिरवाळे यांनी व्यक्त केले आहे. श्रीगोंदा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पत्रकार कुरुमकर यांचा शिरवाळे कुटुंबांनी आपल्या म्हातार पिंपरी येथील निवासस्थानी सन्मान करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी आपल्या गौरवउद्गार पर भाषणात समाजभूषण दादासाहेब शिरवाळे पुढे म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांना कोणताही वारसा नसताना गेली 25 ते 26 वर्ष समाजभिमुख पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी असून; तालुक्याचा सामाजिक राजकीय; शैक्षणिक; धार्मिक व प्रशासकीय व मूलभूत प्रश्नांनान बाबींचा चौफेर आढावा घेत कुरुमकर हे उत्तम प्रकारे लिखाण करताना दिसत आहेत. एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. त्यांच्या लेखनातून तालुक्यातील अनेक प्रश्नांना न्याय मिळताना दिसतो. सतत समाजभिमुख लिखाण करून सामाजिक प्रश्नांना नेहमीच कुरुमकर यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून प्राधान्य देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तालुक्यातील वेगवेगळे प्रश्न जाणून घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा कुरुमकर यांचा सतत प्रयत्न आहे. श्री शिरवाळे आणखी पुढे बोलताना म्हणाले की; आपल्या पंचवीस वर्षाच्या पत्रकारितेत ज्ञानी व गुणवंतांचे देखील प्रसिद्धीच्या माध्यमातून भरभरून प्रेरणादायी लिखाणाद्वारे कौतुक करत त्यांनी आपल्या बंधुत्वाचे सर्वांशी उत्तम प्रकारे नाते जोडले. एक दिलदार व सर्वांशी हसतमुख असणारे पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची नुकतीच श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्या निवडीचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे कौतुक समाज भूषण दादासाहेब शिरवाळे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी शिरवाळे परिवारातील श्री हर्षल शिरवाळे; श्री आकाश शिरवाळे; श्री रूपक शिरवाळे यांच्यासह त्यांचा सर्व परिवार यावेळी उपस्थित होता.
दरम्यान त्याच दिवशी बुधवारी 14 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा शुगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पद्मा शिर्के मॅडम यांनी श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी कुरुमकर त्यांची निवड झाल्याबद्दल शाळेच्यावतीने आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका पद्मा शिर्के यांनी पत्रकार कुरुमकर यांचे भरभरून कौतुक करत म्हणाल्या की;त्यांचे पत्रकारितेतील लिखाण वास्तवाला धरून असते गुणवंत विद्यार्थी व ज्ञानवंत शिक्षकांच्या विविध उपक्रमाची प्रसिद्धीच्या माध्यमातून नेहमीच कुरुमकर यांनी दखल घेतली. या त्यांच्या उत्कृष्ट लिखाणामुळे व विद्यार्थी व शिक्षकांचे मनोधैर्य वाढवून आमच्या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक हे तालुका व जिल्हास्तरीय विविध पुरस्काराला प्राप्त होत आहेत. या पुरस्कारामागे पत्रकार कुरुमकर यांचाही सिंहाचा वाटा आहे हे आमच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती पदमा शिर्के यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या सन्मान सोहळ्यास उपशिक्षिका श्रीमती निर्मला डोंगरे मॅडम; श्री. रवींद्र होले सर; श्री. संदीप हिरवे सर; श्रीमती बाळूबाई गवळी मॅडम; श्रीमती पिंकी पाचांगणे मॅडम; श्रीमती आश्विनी पऱ्हे मॅडम; शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार रवींद्र होले सर यांनी मानले.
वाचक क्रमांक :