यवत येथील शाळेच्या प्राणांगणात. ७८ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा. स्वतंत्र सैनिक भोगीलाल प्रेमचंद शहा यांच्या आठवणींना उजाळा.

By : Polticalface Team ,16-08-2024

यवत येथील शाळेच्या प्राणांगणात. ७८ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा. स्वतंत्र सैनिक भोगीलाल प्रेमचंद शहा यांच्या आठवणींना उजाळा.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १५ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्राणांगणात ७८ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनसह यवत गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली होती. या प्रसंगी संपूर्ण गावात चिमुकल्या विद्यार्थी मुला मुलींच्या हातात तिरंगा झेंडा पाहुण पालकांचे व नागरिकांचे या प्रभात फेरी कडे लक्ष वेधले होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक चा ध्वजारोहन सैन्य दलातील सुबेदार मेजर राजू डोंबाले. यांच्या हस्ते करण्यात आले. व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन. यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुभाष बांपु यादव. यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विद्या विकास मंदिर शाळेतील ध्वजारोहण यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर मारुती दोरगे. यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. ७८ व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने विद्या विकास मंदिर. विद्यालयातील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व पारंपारिक देशभक्ती वरील गीतांनवर कला नृत्य सादर करुन उपस्थित मान्यवरांचे व पालक नागरिकांचे लक्ष वेधले होते. या प्रसंगी सरपंच समीर दोरगे व जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम यांच्या हस्ते सैन्य दलातील सुभेदार श्री राजु डोंबाळे. यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. असिस्टेंट रिक्रूटिंग ऑफिसर कटक ओडिसा येथे सैन्य दलात कार्यरत आहेत. 

यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे. उपसपंच सुभाष बांपु यादव. माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे. जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम माजी पंडीत भाऊ दोरगे. यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश आण्णा यादव. उद्योजक संजय शहा. तसेच (सेवानिवृत) नायब सुभेदार ज्ञानदेव भोंडवे १६ वी बटालियन मराठा लाइट इन्फेंट्री. सध्या खामगाव या ठिकाणी फॉरेस्ट वन विभाग (वनरंक्षक) अधिकारी आहेत. (सेवा निवृत्त) पोलीस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड. या मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतचे मुख्याध्यापक श्री रामभाऊ दोरगे व विद्या विकास मंदिर शाळेच्या वतीने हितेंद्र गद्रे सर यांनी शाळेच्या विकासात्मक प्राथमिक मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम. यांनी मनोगत व्यक्त करत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी व्यंकटेश मल्टीटेस्ट शाखा यवत यांच्या वतीने १० वी १२ मध्ये गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी पुष्प गुलाब देऊन गौरविण्यात आले. यवत पंचक्रोशीतील पालक महिला वर्ग नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. 

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने

जमलेल्या नागरिकांमध्ये जुन्या आठवणींना चर्चेतून उजाळा देण्यात आला. सच्चे गांधीवादी विचारसरणीचे स्वातंत्र्य सेनानी म्हणजे यवत गावचे बापुजी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भोगीलाल शहा व राया काका अवचट यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. स्वातंत्र्याचा लढा पुन्हा नजरे समोर दिसु लागला. तत्पूर्वीचे गावगाड्यातील कारभारी आठवतात का. ?  डॉ जयवंत भट. वसंतराव दोरगे पाटील. का बा दोरगे पाटील. एकनाथराव दोरगे. नारायणराव दोरगे. लक्ष्मण काका अवचट. यांचे (चिन्ह मानुस) त्यानंतर अपक्ष उमेदवार चिमाजी गायकवाड यांचे चिन्ह होते ( कुत्रा ) वार्ड क्रमांक चार मधील उमेदवार. आठवतंय का ? असे म्हणत चार चौघात बरीच उलट सुलट.व हसत खेळत चर्चा रंगली. 


आज दि १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बोलताना भारत देशाच्या स्वतंत्र चळवळीत सहभाग होता ते यवत गावातील दोन स्वतंत्र सैनिक भोगीलाल प्रेमचंद्र शहा. यांचा जन्म १६ मार्च१९१९ साली यवत ता. दौंड, जिल्हा पुणे.या ठिकाणी झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ७ वी पर्यंत. त्यांचे शिक्षण झाले. ते गांधीजींच्या विचाराने झपाटले असल्याने त्यांनी संपुर्ण जिवन जनहितार्थ व जनजागृती साठी वाहुन घेतले होते. यवत गावातील स्वतंत्र सैनिक राया काका अवचट. व भोगीलाल प्रेमचंद शहा. यांनी १९४२ स्वातंत्र्याच्या लढ्यात तत्पूर्वी कामगिरी बजावली होती.गांधीवादी विचाराचे पत्रके वाटताना त्यांना ब्रिटिश इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करुन येरवडा कारागृहात बंदिस्त केले होते. दि १५ ऑगस्ट २६ जानेवारी. या राष्ट्रीय कार्यक्रमात यवत येथील जेष्ठ नागरीकांना त्यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. साधी राहणी व उच्च विचार सरणीचे व्यक्तिमत्व. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्याने घरी राजकीय पुढारी लोकांची खलबते व नेहमी उठ बस असायची.  तालुका व जिल्हातील पुढाऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. यवत गावात त्यांनी प्रथम नळ पाणी पुरवठा योजना राबवून. मुख्यमंत्री मा.वसंतराव नाईक यांच्या हस्ते उद्घाटनाचा जोरदार कार्यक्रम करण्यात आला होता.१५ ऑगस्ट व २६ जानेवारी ला शाळेतील राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ते न अडखळता स्वातंत्र्यावर निर्भिड पणे वक्तव्य करत भाषणे देत असे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना भाषणासाठी बोलवत असत. अचानक एक दुर्दैवी घटना घडली. २०/५/१९७५ रोजी पाटस येथे नवरा नवरीचा समावेश असलेल्या वऱ्हाडाच्या ट्रक चा रेल्वे गेटवर

जोरदार अपघात झाल्याने अनेकांचे मृतदेह ट्रक सह दूरवर फेकले गेले.  कोणीही जिवंत राहिले नव्हते. ही बातमी स्वतंत्र सैनिक भोगीलाल प्रेमचंद शहा. त्यांना समजल्यावर त्यांनी सकाळीच घटना स्थळी मदतकार्य करण्यासाठी धाव घेतली. आवश्यक सुविधा उपलब्ध नसतानाही संबंधित नातलगांना मदत केली. तेथील दुर्घटना व परिस्थिती पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते दुःखाने हळहळले. घरी आले तरी ते सर्वांना त्या दुर्दैवी घटने बद्दल सांगत होते. त्यांच्या हळव्या मनावर अतिशय खोलवर अघाताचा प्रभाव झाल्याने. त्याच संध्याकाळी अचानक हृदयविकाराच्या आजाराने त्यांचे निधन झाले. हि धक्कादायक खबर काही वेळातच संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण दौंड तालुक्यात व गावा गावात शोक सभा घेऊन त्यांच्या स्मरणार्थ सारं गाव हळहळले. ग्रामपंचायतीने त्यांच्या सन्मानार्थ गावातील मुख्य रस्त्यास त्यांचे नाव दिले होते. तेव्हा ते जिल्हा परिषद सदस्य असल्याचे समजले. स्वातंत्र्य सैनिक म्हणुन त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले होते. दौंड नगरपरिषदेने जाहीर करून सदर सन्मान चिन्ह व मानपत्र त्यांचे चिरंजीव. अँड विलास भोगीलाल शहा यांनी स्विकारले. स्वतंत्र सैनिक भोगीलाल प्रेमचंद शहा त्यांच्या देश भक्ती व स्वातंत्र्य चळवळीतील लढावू कार्याची प्रेरणा येवतकरांच्या कायम स्वरूपी स्मरणात असल्याची जाणीव चर्चेतून झाली. प्रत्येक १५ ऑगस्ट २६ जानेवारी या राष्ट्रीय कार्यक्रमा मध्ये त्यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.