१५ ऑगस्ट रोजी नागवडे यांचा अभिनव उपक्रम -- वीर पत्नीच्या हस्ते झेंडावंदन.

By : Polticalface Team ,16-08-2024

१५ ऑगस्ट रोजी नागवडे यांचा अभिनव उपक्रम -- वीर पत्नीच्या हस्ते झेंडावंदन.

लिंपणगाव प्रतिनिधी :     सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर तसेच विविध शैक्षणिक संकुलामध्ये शहीद जवानांच्या धर्मपत्नी आणि माजी सैनिकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम राबविल्यामुळे सैनिक संघटनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

           15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्री.  छत्रपती शिवाजी महाविद्यालय, इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी शुगर, सोनिया गांधी पॉलिटेक्निक, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान तसेच ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या  व श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. राजेंद्रदादा नागवडे यांनी यावर्षी सर्व ठिकाणी वीर शहीद जवानांच्या पत्नी किंवा माजी सैनिक यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त सैनिक प्रकाश चव्हाण यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित असणाऱ्या मेजर कुंडलिक जंजिरे,  सुभाष ठोकळ, तात्यासाहेब चव्हाण, संभाजी  तरटे, बाळासाहेब लगड यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. संचालक लक्ष्मण रायकर, मारुती पाचपुते, अॅड. अशोक  रोडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पंदरकर, संदीप कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ,  कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, सर्व खाते प्रमुख व कामगार,  प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे राजेंद्र दादा नागवडे यांच्या उपस्थितीत वीरपत्नी श्रीमती मोहिनी मधुकर म्हस्के यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी संचालक प्रा. सुरेश रसाळ प्राचार्य डाॅ.  सतीशचंद्र सूर्यवंशी व कॉलेजचा सर्व सेवक वृंद उपस्थित होता.  इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी शुगर येथे सेवानिवृत्त सैनिक महादेव सखाराम पवार यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले तर तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा येथे वीरपत्नी श्रीमती सुरेखा हनुमंत काळे यांच्या हस्ते व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.अनुराधा नागवडे प्राचार्य अमोल नागवडे, निरीक्षक सुरेश गोलांडे व सर्व सेवकवृंद यांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले.

         त्याचप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सर्व विद्यालयांमध्ये स्थानिक सेवानिवृत्त सैनिकांच्या शुभहस्ते झेंडावंदन करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने सैनिकी जीवन व सैनिकी जीवनातील रोमांचक अनुभव विद्यार्थ्यांना ऐकण्याची संधी मिळाली. राजेंद्र दादा नागवडे यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल आजी-माजी सैनिक संघटनेने अभिनंदन केले असून आभार व्यक्त केले आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी