By : Polticalface Team ,16-08-2024
लिंपगाव प्रतिनिधी : विजय प्रेमराज मुथा व रमजान हाशमभाई हवालदार यांची सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या स्वीकृत तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जानेवारी 2022 मध्ये झाली. तदनंतर महाराष्ट्र सहकारी कायदा व कारखान्याच्या पोटनियमानुसार संचालक मंडळामध्ये प्रथम अनिल देवराम पाचपुते व बंडू अण्णासाहेब पंदरकर यांना दोन वर्षासाठी तज्ञ संचालक म्हणून स्वीकृत करण्यात आले होते. दिनांक 10-5- 2024 रोजी त्यांची मुदत संपुष्टात आल्यामुळे दिनांक 29 -7 -2024 रोजीचे मा. संचालक मंडळ सभेमध्ये झालेल्या निर्णयानुसार कारखान्याचे श्रीगोंदा येथील सभासद विजय पेमराज मुथा व चिंभळा येथील सभासद रमजान हाशमभाई हवालदार यांना तज्ञ संचालक म्हणून स्वीकृत करण्यात आले. मुथा आणि हवालदार यांच्या निवडीमुळे अल्पसंख्यांक समाजाला कारखाना संचालक मंडळात प्रतिनिधित्व देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी अमृत शेठ पितळे व सुभाष शेठ गांधी यांना संचालक मंडळामध्ये काम करण्याची संधी दिली होती. परंतु हवालदार यांच्या निवडीने मुस्लिम समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळालेले आहे. नागवडे कुटुंबीयांनी नेहमीच समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळे मुथा व हवालदार यांची निवड करण्यात आली आहे.
विजय मुथा व रमजान हवालदार यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, सर्व संचालक मंडळ सदस्य, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष काका शिंदे, दूध संघाचे चेअरमन सोपानराव थिटे, कामगार युनियनचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :