क्रीडा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार शितोळे यांची निवड

By : Polticalface Team ,16-08-2024

क्रीडा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार शितोळे यांची निवड

लिंपणगाव प्रतिनिधी : रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी अहमदनगर जिल्हा क्रीडा महासंघाची सर्वसाधारण सभा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे सकाळी 11:30 वां सुरू झाली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यामधील बहुसंख्य शिक्षक सहभागी झाले होते. सर्वप्रथम अकोला येथील क्रीडा शिक्षक श्री. सोपानराव लांडे यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात झाली .

शैक्षणिक वर्ष 2024 25 या वर्षात नवीन तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिव यांचा क्रीडा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षकांच्या ऑनलाइन  कामातील अडचणी, अग्रीम रक्कम ,खेळाडू अपघात विमा, ग्रामीण साठी असलेला १६ वर्षाचा  शालेय वयोगट पुन्हा अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे, खेळाडूंचे ५ टक्के आरक्षण कायम करण्यासाठी प्रयत्न करणे, जिल्हा, राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा पुरस्कार देवून सन्मान करणे, क्रीडा शिक्षक अधिवेशन आयोजित करणे, क्रीडा शिक्षक पद पवित्र पोर्टल मध्ये समाविष्ट करणे, पहिली ते आठवी प्राथमिक शिक्षणासाठी १ क्रीडा  शिक्षकाची भरतीसाठी शासनाकडे आग्रह करणे, २५० विद्यार्थ्यामागे १ तर 500 विद्यार्थ्यांनापर्यंत २ क्रीडाशिक्षक पदे मागणी करणे. क्रीडा शिक्षकांना वेळापत्रकामध्ये पाचवी ते दहावी वर्गावर ५०% पी. टी ताशिका देणे, अशा विविध विषयावर विचार मंथन व सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी नव निर्वाचित क्रीडा समिती अध्यक्ष यांचा विद्यापीठाचे प्राध्यापक व व्याख्याते श्री. जितेंद्र मेटकर सर व राज्याचे राज्य क्रीडा अध्यक्ष राजेंद्र कोतकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष श्री राजेंद्र कोतकर यांनी सर्व शिक्षकांना भविष्यातील क्रीडा शिक्षकांची पदे आणि समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले. तर नवीन कार्यकारणीची निवड करण्यासाठी ५ ज्येष्ठ शिक्षकांची निवड समिती गठीत केली .त्यामध्ये क्रीडा संघाचे माजी 

अध्यक्ष सुनील गागरे सचिव प्राचार्य शिरीषजी टेकाडे 

 सोसायटीचे संचालक 

महिंद्र हिंगे व क्रीडा महासंघाचे 

राज्य खजिनदार श्री घनश्याम सानप व

ज्येष्ठ क्रीडा शिक्षक प्रशांत होन यांचा समावेश करण्यात आला. अध्यक्ष निवड  नंदकुमार शितोळे यांनी तर प्रास्ताविक अहमदनगर जिल्हा क्रीडा महासंघाचे माजी अध्यक्ष सुनील गागरे यांनी केले तर अनुमोदन व नवीन कार्यकारणीची घोषणा  अहमदनगर जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्री शिरीष टेकाडे यांनी केले. निवडी पूर्णत्वास जात असताना अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व सोसायटीचे विद्यमान संचालक शिक्षक नेते श्री. आप्पासाहेब शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील गागरे तर प्रमुख अतिथी श्री राजेंद्र कोतकर होते. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:-नंदकुमार शितोळे  अध्यक्ष (श्रीगोंदा)

नितीन घोलप सचिव.  ( राहुरी )

श्री बाळासाहेब मुळे कार्यालयीन सचिव (नगर)

श्री अजित वडवकर  कार्याध्यक्ष (कर्जत)

 तर

उपाध्यक्ष 

श्री बापूराव होळकर  (पारनेर )

श्री राजेंद्र शिरसाठ  (पाथर्डी )

श्री संजय कंगले  (श्रीरामपूर )

श्री राघवेंद्र धनलगडे  (जामखेड)

सहसचिव

श्री हनुमंत गिरी (राहता)

 श्री पोपटराव काळे ,(शेवगाव)

 श्री शिव प्रसाद घोडके (कोपरगाव )

श्री नारायण कडू (नेवासा)

 खजिनदार

श्री ज्ञानेश्वर भोत (संगमनेर)

प्रसिद्धी प्रमुख श्री संदीप घावटे (श्रीगोंदा)

तर कार्यकारणी सदस्य

दिलीप झोळेकर (अकोले )

भारत शिंदे (अकोले) बापूराव गायकवाड (श्रीगोंदा )

दादासाहेब शिंगाडे (कर्जत)

 गंगाराम खोडदे (पारनेर) 

एकनाथ पालवे( पाथर्डी) पंकज जगताप (राहुरी) बबन सातकर (राहता) काकासाहेब चौधरी (श्रीरामपूर)

 धनंजय देवकर (कोपरगाव)


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.