दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता १६ ऑगस्ट २०२४ देशातील १२ राज्यातीलएकूण ७८ मुलांचा सहभाग होता. त्या पैकी महाराष्ट्रातून नऊ मुले सहभागी झाले होती. आणि पुणे जिल्ह्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे दोन मुले सहभागी झाली होती. त्या दोनही मुलांचे स्वीडन बर्लिन येथे होणाऱ्या आईस हॉकी स्केटिंग. म्हणजेच स्केटिंग बर्फा वरील हॉकी मिनी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये त्यांची निवड झाली असल्याची माहिती समाधान दाने सर यांनी दिली. या संदर्भात निवड झालेल्या दोन्ही मुलांचे संपूर्ण महाराष्ट्रात व पुणे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. या बाबत अधिक माहिती अशी की भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची मोठी संधी या दोन्ही मुलांना मिळाली आहे. दौंड तालुक्यातील कु.अजित शरद पवार. रा. कानगाव ता दौंड जिल्हा पुणे.व कु.क्षितिज पराग कुंभार. रा.बोरीपारधी चौफुला ता दौंड जिल्हा पुणे. अशी या दोन्ही मुलांची नावे आहेत. दिल्ली येथील राष्ट्रीय आईस हॉकी निवड चाचणी कॅम्पमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. दि ११-१२ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्ली येथील गुरुग्राम या ठिकाणी आईस हॉकी मैदानात हा कॅम्प संपन्न झाला. भारतीय संघात निवड झालेल्या कु.अजित शरद पवार. आणि कु क्षितिज पराग कुंभार. या दौंड तालुक्यातील दोन्ही मुले गेली तीन वर्षा पासून स्केटिंग चा सराव करत आहेत. या तीन वर्षाच्या कालावधीत सरावाच्या व मेहनतीच्या दृष्टीने त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले असल्याचे राज्यस्तरीय निवडीतून नक्कीच सिद्ध झाले असून या पुढे अधिक जोमाने सराव करून उच्च स्तरावर लवकरच ऑलिंपिक सारख्या जागतिक पातळी वरील स्पर्धेमध्ये झळकतील अशी अपेक्षा व्यक्त केली असुन ऑलम्पिक कमिटीचे अभिषेक शर्मा सर यांच्या हस्ते सर्टिफिकेट व मेडल प्रदान करुन सन्मानित करण्यात आले असल्याचे बोरीपारधी चौफुला येथील समाधान दाने सर यांनी सांगितले.
आईस हॉकी हा खेळ ही ऑलम्पिक मध्ये खेळला जातो तसेच हा जगातील पातळीवर सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. पश्चिमी राष्ट्रांमध्ये हा खूप उत्साहाने खेळला जाणारा खेळ आहे. लवकरच ऑलिंपिक मध्ये भारतीय संघ देखील हा खेळ खेळण्यासाठी आपला संघ पाठवणार असून ही मुले त्या संघामध्ये असू शकतील अशी आशा ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीने दर्शवली आहे. त्यामध्ये दौंड तालुक्यातील हा जोड नक्कीच आपला पराक्रम गाजवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कु.अजित शरद पवार. आणि कु क्षितिज पराग कुंभारया दोन्ही मुले ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये स्केटिंग प्रशिक्षण घेत आहेत. समाधान दाणे सर, गणेश घुगे सर. विजय टिपूगडे सर. प्रवीण होले सर. आणि आकाश कसबे सर यांनी प्रशिक्षणार्थ मार्गदर्शन केले. डॉ निलेश लोणकर संदीप टेंगले सर शरद पवार सर पराग कुंभार सर प्रियंका दाने महाराष्ट्र पोलीस रूपाली टेंगले महाराष्ट्र पोलीस व समस्त केडगाव चौफुला बोरिपारधी यवत तसेच दौंड तालुक्यातील समस्त ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे