माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिग्गज युवा नेते एकाच व्यासपीठावर मोहिते पाटील बंधू सह आमदार रोहित दादा पवार यांची उपस्थिती

By : Polticalface Team ,17-08-2024

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिग्गज युवा नेते एकाच व्यासपीठावर मोहिते पाटील बंधू सह आमदार रोहित दादा पवार यांची उपस्थिती करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तीन युवानेते एकाच व्यासपीठावर, मोहिते पाटील बंधूसह रोहितदादा पवार यांची उपस्थिती असणार अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी दिली. येत्या शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस असून या निमित्ताने जेऊर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबद्दल माहिती देताना देवानंद बागल यांनी सांगितले की वास्तविक माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमानी साजरा केला जातो. ही गेली तीस वर्षांपासून चालू असलेली रीत आहे. पण तरीही यंदाचा वाढदिवस हा आम्हा कार्यकर्त्यांसाठी खास असून यानंतर सर्व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वस्व अर्पण करून व स्वतःला झोकून देऊन रनांगणात उतरावे लागणार आहे. आगामी निवडणुकीत नारायण (आबा) यांना विजयी करण्यासाठी युवकांची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. दिनांक 23 ऑगस्ट रोजी राज्यातील तीन युवानेते एकाच व्यासपीठावर येत आहेत. नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील व राज्यातील एक अभ्यासू युवानेतृत्व म्हणून ओळख असलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा चेहरा म्हणून आपल्या भाषणानी राज्यातील सभा गाजवणारे आमदार रोहितदादा पवार यांनीही दिनांक 23 ऑगस्ट रोजी आपण येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे हा दिवस युवकांसाठी प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे देवानंद बागल यांनी सांगितले. कार्यक्रमाची तयारी सुरु झाली असून मिनी मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबीर या सामाजिक तसेच क्रीडा उपक्रमांसाहा कर्मयोगी व्याख्यानमाला आयोजित केली गेली आहे. जेऊर येथील दिनांक 22 व 23 ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमास करमाळा माढा तालुक्यातील नागरिकांसह युवकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आव्हान देवानंद बागल यांनी केले.यावेळी सभापती अतुल पाटील, सरपंच पृथ्वीराज पाटील, प्रा अर्जुनराव सरक, प्रा डॉ संजय चौधरी, उपसरपंच नागेश झाजूरणे,विनोद गरड, संदीप कोठारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी