मिश्र लागवडीतून लाखोंचं उत्पन्न; बीडमध्ये खजूर, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद फळांची लागवड

By : Polticalface Team ,17-08-2024

मिश्र लागवडीतून लाखोंचं उत्पन्न; बीडमध्ये खजूर, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद फळांची लागवड

बीड : शेती करण्यास सध्याची तरुण पिढी बहुदा  नकार देत आहे. अस्मानी संकट, शेती मालाला योग्य बाजारभाव न मिळणे आणि भांडवला साठी लागणारा पैसा यामुळे शेती करण्यास तरुण इच्छूक नाहीत असं असे दिसते  . पण  काही लोक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग  करून शेतीत  विविध प्रकारचे प्रयोग करतात . पण  बीडची  एक महिला शेतकरी खजूर, ड्रॅगन फ्रुट आणि सफरचंदची शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेते . विशेषबाब  म्हणजे बीड हा दुष्काळी जिल्हा असून देखील त्यांनी अतिशय यशस्वी रित्या शेतीचे नियोजन केलं आहे. चला तर मग जाणून घेऊ त्यांची यशोगाथा....

तीन एकर क्षेत्रात विविध पिकांची लागवड

विजया गंगाधर घुले असं या  महिला शेतकऱ्याचे नाव आहे  त्या बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवाशी असून . विजया घुले यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत योग्य मिश्र शेती करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये सुरवातीला विजया घुले यांनी अर्धा एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्णय घेतला. नंतर कालांतराने खजूर आणि सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय पण घेतला. विजया यांनी खजूरची 80 झाडे तर सफरचंदचे 240 झाडे लावलेली  आहे. म्हणजे एकूण तीन एकर क्षेत्र हे मिश्र पिकासाठी गुंतवलेले  आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या तिनही पिकांमधून त्यांना भरघोस असे  उत्पन्न मिळत आहे.

खजुरातून मिळाले अडीच लाखांचे उत्पन्न

सध्या खजूर पिकाचे उत्पादन सुरू झाले असून त्यातून त्यांना  चांगला आर्थिक फायदा होत असल्याचं विजया यांनी सांगितले. प्रत्येक झाडापासून पहिल्याच वर्षी 70 किलो ते 120 किलोपर्यंत फळे मिळाली तो बाजारपेठेत 70 ते 100 रुपये दराने विक्री केला गेला . तर किरकोळ बाजारांमध्ये 160 ते 200 रुपयां पर्यंत खजूरची विक्री केली आहे . खजूराच्या 80 झाडापासून पहिल्याच वर्षे अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते . तर पुढील वर्षी प्रती झाड दीडशे ते पावणे दोनशे किलो पर्यंत खजूर मिळणे अपेक्षित आहे.

पुढील वर्षी दहा लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

पुढच्या वर्षी तीन एकर क्षेत्रामधून कमीत कमी 20 ते 25 लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ड्रॅगन फ्रूटचे चार ते पाच लाख रुपये उत्पन्न तसेच खजूरचे चार ते पाच लाख रुपये उत्पन्न असे एकाच एकरामध्ये कमीत कमी दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याचे अपेक्षा त्यांना  आहे.

जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने सन्मान

राज्यातील तसेच देशातील  शेतकऱ्यांनी मिश्र शेतीकडे वळले तर त्यांनाही शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळेल. अतिशय कमी कष्टात कसलाही रासायनिक स्प्रे चा वापर न करता येणारी ही शेती असल्यामुळे ते भविष्यात नेहमीच फायद्याची ठरली जाऊ शकते . विजया घुले यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 2022 - 23 चा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देऊन विजया घुले यांच्या कार्याचा  सन्मान केला आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.