माध्यमिक शिक्षक सोसायटी कडून पदोन्नती व विविध क्षेत्रात निवडीबद्दल सन्मान सोहळा संपन्न

By : Polticalface Team ,19-08-2024

माध्यमिक शिक्षक सोसायटी कडून पदोन्नती व विविध क्षेत्रात निवडीबद्दल सन्मान सोहळा संपन्न लिंपणगाव (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीकडून सोसायटीच्या सभासद असलेल्या गुणवंत मुख्याध्यापक यांना पदोन्नती व आदर्श मुख्याध्यापक तसेच क्रीडा क्षेत्रात पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सहकार क्षेत्रात संचालकपदी मिळालेला बहुमान; शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना श्रीगोंदा येथे माध्यमिक शिक्षक सोसायटी सभागृहात संस्थेच्या परंपरानुसार आमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक दिलीपराव काटे हे होते. यावेळी सहकार महर्षी नागवडे कारखान्याच्या संचालकपदी शिक्षक नेते श्री रमजान हवालदार सर यांची नियुक्ती झाल्याने त्यांचाही सन्मान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रामुख्याने सन्मानित करण्यात आलेले सत्कारमूर्ती पुढीलप्रमाणे:- मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल उद्धवराव गायकवाड सर; राजेंद्र हिरवे सर; आनंदा पुराणे सर; बापूराव भिसेसर; दिलीप देवीकर सर; विश्वास ससाणे सर यांना सन्मानित करण्यात आले; तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री राजेंद्र कळस्कर सर यांना देखील सन्मानित करण्यात आले. श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीचे नवनियुक्त कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी सचिन जामदार सर तर सचिव पदी तुषार नागवडे यांची निवड झाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. क्रीडा समितीत महिला प्रतिनिधी म्हणून अर्चना कोरडे मॅडम; दीपक धारकर; कैलास ढवळे सर; यांना संधी मिळाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला तर राजेंद्र जामदार सर यांची जिल्हा क्रीडा समिती निवड झाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. प्रामुख्याने नामांकित असलेली श्रीराम पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी विलासराव शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचाही सन्मान करण्यात आला. रुई गव्हाण सोसायटीचे चेअरमन सुनील पवार सर यांची निवड झाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच गणित अध्यापक संघटनेचे मा अध्यक्ष राजेंद्र बारगुजे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेचे सभासद व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. या सर्वच सत्कारमूर्तींचा माध्यमिक सोसायटीकडून यथोचित असा सन्मान करून पुढील कार्यास वरील पदाधिकारी; प्राचार्य; मुख्याध्यापक यांना माध्यमिक सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री दिलीपराव काटे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी याप्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक व शिक्षक नेते रमजान हवालदार यावेळी बोलताना म्हणाले की संस्थेचे माजी चेअरमन दिलीपराव काटे यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत चांगल्या प्रकारे हेरिंग केले; गेल्या वर्षभरात श्री दिलीपराव काटे यांनी संस्थेचा उत्तम प्रकारे कारभार पाहिला त्याबद्दल श्री हवालदार सर यावेळी कौतुक करत संस्थेने सभासदांचा हा गुणगौरव सोहळा आयोजित केल्याबद्दल संस्थेला धन्यवाद दिले. संस्थेचे माजी संचालक देवराव दरेकर; मुख्याध्यापक आप्पासाहेब वागस्कर; प्राथमिक बँकेचे माजी चेअरमन संतोष गायकवाड; जिल्हा क्रीडा समितीचे सदस्य बापूराव गायकवाड; भास्कर जगताप सर; संभाजी काकडे सर; कुतवळ सर; गांजुरे सर ; संदीप गायकवाड सर यांच्यासह शाखाधिकारी वैभव चौगुले; कानिफनाथ तुर्कुंडे व स्वप्नील पवार तसेच संस्थेचे अन्य सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन देविदास खेडकर यांनी केले आभार सचिन जामदार सर यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी