लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिरात तिसऱ्या सोमवारी भक्तांकडून दर्शनासाठी मोठी गर्दी
By : Polticalface Team ,19-08-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली. दरम्यान लिंपणगावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज हे भावी भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये श्रावण शुद्ध महिना म्हटलं की; पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून भाविक भक्त दर्शनासाठी आवर्जून मंदिरात येतात. सिद्धेश्वराला नतमस्तक होतात. वर्षपूर्तीचे साकडे महाराजांना घालतात एक प्रसन्न व आनंदी वातावरणामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून सिद्धेश्वर महाराजांना महाअभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसली. त्यामध्ये अनेक भाविक भक्तांची या सिद्धेश्वर महाराजांवर अपार श्रद्धा असल्याने कौटुंबिक अडचणी यासह वर्षभराची वचन पूर्ती पूर्ण व्हावी यासाठी सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालतात. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी कुटुंबासमवेत सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत महाभिषेक घातला यावेळी विधीतज्ञ सुधीर कुलकर्णी व पुरवतात यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान सिद्धेश्वर महाराजांचे देवस्थान हे काष्टी श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गावर प्रसन्न वातावरणात मंदिराची वास्तू असल्याने प्रत्येक श्रावण महिन्यात दर सोमवारी भक्त दर्शनाचा लाभ घेतात. त्यातून एक धार्मिक श्रद्धा भक्तांमध्ये निर्माण होते. श्रावण महिना सुरू होताच ग्रामस्थ व सप्ताह मंडळाकडून आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करून राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन व प्रवचने आयोजित करतात . अशावेळी भाविक भक्त श्रावणी सुखाचा लाभ घेतात. यावेळी असंख्य भाविक भक्त या कीर्तन सोहळ्याचा लाभ घेतात. सप्ताह मंडळाकडून देखील कीर्तन सोहळा संपन्न झाल्यानंतर तात्काळ महाप्रसाद भाविक भक्तांना दिला जातो. त्यामध्ये प्रत्येक सोमवारी अन्नदात्यांकडून दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना खिचडी वाटप करण्यात येते. भाविक भक्तांसाठी धार्मिक विधी पार पाडण्यासाठी ज्येष्ठविधी तज्ञ सुधीर कुलकर्णी व गुरव दाम्पत्य हे भावी भक्तांना महा अभिषेक घालण्यासाठी व दर्शनासाठी परिश्रम घेतात
वाचक क्रमांक :