By : Polticalface Team ,21-08-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)-श्रीगोंदा येथील आयोजित तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी ओम कुंडलिक पवार हा ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कुस्ती स्पर्धेमध्ये 19 वय 60 किलो वजनगटामध्ये प्रथम आला असून; या यशस्वी विद्यार्थ्याच्या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेच्यात पहिल्यांदाच मानाचा तुरा मिळवला आहे.
श्रीगोंदा येथे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात चालू वर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत व्यंकनाथ विद्यालय व ज्यनिअर कॉलेजचा विद्यार्थी ओम पवार याने कुस्ती स्पर्धेत दैदीप्यमान हे संपादन केले. या विद्यार्थ्यांची 27 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड घोषित झाली आहे. कुमार ओम पवार या विद्यार्थ्याला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक तुषार नागवडे व प्रा निसार शेख आदींनी भरीव असे मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; उपाध्यक्ष बाबासाहेब भोस संस्थेचे सर्व शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; स्कूल कमिटीचे अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संचालक डी आर आबा काकडे; स्कूल कमिटीचे सर्व विश्वस्त मंडळ; प्राचार्य आनंद पुराणे सर यांच्यासह सेवक वृंदांनी अमोल पवार याचे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :