नोकरी सोडून पिकवली कोरफड, साताऱ्याच्या युवा शेतकऱ्याची वार्षिक उलाढाल तब्बल 3.5 कोटी!पारंपरिकतेचा मोह जुन्या शेतकऱ्यांना सुटणं तसं कठीण. पण साताऱ्याच्या या शेतकऱ्यानं कुतुहलानं कोरफड लावली आणि हा निर्णय त्याचं नशीब बदलणारा ठरला.

By : Polticalface Team ,23-08-2024

नोकरी सोडून पिकवली कोरफड, साताऱ्याच्या युवा शेतकऱ्याची वार्षिक उलाढाल तब्बल 3.5 कोटी!पारंपरिकतेचा मोह जुन्या शेतकऱ्यांना सुटणं तसं कठीण. पण साताऱ्याच्या या शेतकऱ्यानं कुतुहलानं कोरफड लावली आणि हा निर्णय त्याचं नशीब बदलणारा ठरला.

Agriculture Success Story: आधुनिक पध्दतीने शेती करत आजकाल अनेक शेतकरी लाखोंची उलाढाल करताना दिसत आहेत . शिक्षण झालं की नोकरीच्या मागे न लागता अनेकांनी शेती करणं पसंत केल्याची आता अनेक उदाहरणं समोर येत आहेत. साताऱ्यात नोकरी सोडून एका युवा शेतकऱ्यानं त्याच्या शेतात चक्क कोरफड लावली. आता आंतराष्ट्रीय मागणी मुळे तसेच देशांतर्गत कोरफडीच्या अनेक पदार्थांची मागणी होत असताना त्याला मोठा फायदा झाला आहे . केवळ कोरफडीतून त्यानं वर्षाला साडेतीन कोटींची उलाढाल केली आहे . कोरफड लागवडी मधून (Alovera Farming) आणि त्यातून बनवलेल्या उत्पादनातून ३० टक्के नफा कमवत त्यानं तब्बल ३.५ कोटी रुपये कमावले आहे . द वोकल न्यूज च्या वृत्तानुसार ह्रषिकेश ढाणे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. चिकाटी आणि नाविन्यपूर्णतेने शेती करुन त्यांनं त्याच्यासह कुटुंबाचीही आर्थिक प्रगती साधली आहे . त्याने पारंपरिक पिकांना फाटा देत केली कोरफड शेती जगभरात सध्या कोरफडीसह आयुर्वेदिक आणि शाश्वत गोष्टी वापरण्यावर बहुतांश जणांचा भर असल्याचं दिसून येत आहे . त्वचेसह शरीराच्या अनेक आजारांवर रामबाण समजली जाणारी कोरफड भारतासह परदेशातही सर्रासपणे वापरली जाते . कोरफडीचे महत्व लक्षात घेत आपल्या जमिनीवर कोरफड लावण्याची कल्पना खरंतर धाडसाचीच होती . पारंपरिकतेचा मोह जुन्या शेतकऱ्यांना सुटणं कठीण असताना ऋषिकेशनं कुतुहलानं कोरफड लावली आणि हा निर्णय त्याचं नशीब बदलणारा ठरला. आता सरासरी ८ हजार लिटर कोरफडी पासून उत्पादने बनवून कोट्यवधी रुपये तो कमवत आहे. टाकून दिलेल्या कोरफडीतून झाली सुरुवात साताऱ्यातील पाडळी येथील शेतकऱ्यांला पहिल्यांदा कोरफडीची लागवड करण्याची कल्पनेची एका व्यावसायिकाने ओळख करून दिली. कोरफड वाढवा, लाखो कमवा या घोषणेचं ऋषिकेशला कुतुहल वाटलं होत . अधिक चौकशी केली असता त्याला हा सगळाच प्रकार संशयास्पद वाटला. तोपर्यंत गावातल्यांनी कोरफड लावली होती आणि जसजशी कापणीची वेळ जवळ येऊ लागली तसा व्यापारी गायब झाला आणि शेतकऱ्यांच्या कोरफडीला कोणी वाली उरला नाही. त्यातील कित्येकांनी कोरफड अक्षरश: टाकून दिली.पण ऋषिकेशने या शेतकऱ्यांची टाकून दिलेल्या कोरफडीची रोपे आणून स्वत:च्या शेतात लावली आणि आता त्याची कमाई पाहून गावातील शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. मार्केटिंग कंपनीतील नोकरी सोडली आणि रोपवाटीका केली सुरु कौटुंबिक परिस्थिती बेताची असून वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली आहे . परंतू ती टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावात एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. त्यापासून त्याने साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.२०१३ पर्यंत त्यानं कोरफडीच्या उत्पादनांचं व्यवसायात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे .

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते