By : Polticalface Team ,23-08-2024
Agriculture Success Story: आधुनिक पध्दतीने शेती करत आजकाल अनेक शेतकरी लाखोंची उलाढाल करताना दिसत आहेत . शिक्षण झालं की नोकरीच्या मागे न लागता अनेकांनी शेती करणं पसंत केल्याची आता अनेक उदाहरणं समोर येत आहेत. साताऱ्यात नोकरी सोडून एका युवा शेतकऱ्यानं त्याच्या शेतात चक्क कोरफड लावली. आता आंतराष्ट्रीय मागणी मुळे तसेच देशांतर्गत कोरफडीच्या अनेक पदार्थांची मागणी होत असताना त्याला मोठा फायदा झाला आहे . केवळ कोरफडीतून त्यानं वर्षाला साडेतीन कोटींची उलाढाल केली आहे .
कोरफड लागवडी मधून (Alovera Farming) आणि त्यातून बनवलेल्या उत्पादनातून ३० टक्के नफा कमवत त्यानं तब्बल ३.५ कोटी रुपये कमावले आहे . द वोकल न्यूज च्या वृत्तानुसार ह्रषिकेश ढाणे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. चिकाटी आणि नाविन्यपूर्णतेने शेती करुन त्यांनं त्याच्यासह कुटुंबाचीही आर्थिक प्रगती साधली आहे .
त्याने पारंपरिक पिकांना फाटा देत केली कोरफड शेती
जगभरात सध्या कोरफडीसह आयुर्वेदिक आणि शाश्वत गोष्टी वापरण्यावर बहुतांश जणांचा भर असल्याचं दिसून येत आहे . त्वचेसह शरीराच्या अनेक आजारांवर रामबाण समजली जाणारी कोरफड भारतासह परदेशातही सर्रासपणे वापरली जाते . कोरफडीचे महत्व लक्षात घेत आपल्या जमिनीवर कोरफड लावण्याची कल्पना खरंतर धाडसाचीच होती . पारंपरिकतेचा मोह जुन्या शेतकऱ्यांना सुटणं कठीण असताना ऋषिकेशनं कुतुहलानं कोरफड लावली आणि हा निर्णय त्याचं नशीब बदलणारा ठरला. आता सरासरी ८ हजार लिटर कोरफडी पासून उत्पादने बनवून कोट्यवधी रुपये तो कमवत आहे.
टाकून दिलेल्या कोरफडीतून झाली सुरुवात
साताऱ्यातील पाडळी येथील शेतकऱ्यांला पहिल्यांदा कोरफडीची लागवड करण्याची कल्पनेची एका व्यावसायिकाने ओळख करून दिली. कोरफड वाढवा, लाखो कमवा या घोषणेचं ऋषिकेशला कुतुहल वाटलं होत . अधिक चौकशी केली असता त्याला हा सगळाच प्रकार संशयास्पद वाटला. तोपर्यंत गावातल्यांनी कोरफड लावली होती आणि जसजशी कापणीची वेळ जवळ येऊ लागली तसा व्यापारी गायब झाला आणि शेतकऱ्यांच्या कोरफडीला कोणी वाली उरला नाही. त्यातील कित्येकांनी कोरफड अक्षरश: टाकून दिली.पण ऋषिकेशने या शेतकऱ्यांची टाकून दिलेल्या कोरफडीची रोपे आणून स्वत:च्या शेतात लावली आणि आता त्याची कमाई पाहून गावातील शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
मार्केटिंग कंपनीतील नोकरी सोडली आणि रोपवाटीका केली सुरु
कौटुंबिक परिस्थिती बेताची असून वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली आहे . परंतू ती टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावात एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. त्यापासून त्याने साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.२०१३ पर्यंत त्यानं कोरफडीच्या उत्पादनांचं व्यवसायात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष