ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष जाधव यांची निवड..
By : Polticalface Team ,24-08-2024
जनआधार न्युज
बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव
मो.9112131616
ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे कार्य संपूर्ण भारतात चालू असून अनेक राज्यात महासंघाचे संघटन मजबुत असून महाराष्ट्रात देखील महासंघाचे काम जोरात चालू असून महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. रमेश एस. समुखराव,प्रदेश अध्यक्ष अशोक दराडे,प्रदेश सचिव नंदकुमार नामदास यांनी ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष पदी श्री संतोष पोपटराव जाधव यांची निवड केल्याचे पत्र नुकताच देण्यात आले,वाहन चालक व मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य
करण्यास आपण महासंघाकडे इच्छा व्यक्त केली होती. आपण सामाजिक राजकीय, धार्मिक, श्रमिक
तसेच सर्वधर्म समभाव असे देशहितासाठी व विधायक कार्यामध्ये आपले योगदान असल्याने यापुढेही वाहन
चालक मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो.
तसेच आपल्या महासंघाची कार्यकारिणी वाढविण्याचे कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
म्हणून आपली ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या जिल्हा - अध्यक्ष पुणे या पदावर नियुक्ती
करण्यात आली आहे, याबद्दल आपल्या पुढील यशस्वी कार्यास हार्दिक शुभेच्छा देत नियुक्ती पत्र देण्यात आले.
वाचक क्रमांक :