श्रीगोंदा तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी कायम; अति पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात?

By : Polticalface Team ,25-08-2024

श्रीगोंदा तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी कायम; अति पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात?

नंदकुमार कुरुमकर -लिंपणगाव (प्रतिनिधी)- गेल्या दोन-तीन दिवसापासून श्रीगोंदा तालुक्यात ढगाळमय वातावरण निर्माण होत असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. त्यामध्ये दररोज पावसाच्या सरी बरसल्या जात आहेत. त्यामुळे या वातावरणातील बदलामुळे आरोग्यसह खरिपाच्या उभ्या पिकांवर मोठा दुष्परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून खरीप हंगामाच्या उत्पन्नाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चालू वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस दररोज हजेरी लावताना दिसत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला खरीप हंगामाला हे वातावरण पोषक नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होताना दिसत नाही. त्यामुळे खरिपाची हातातोंडाशी आलेले पिके या अतिवृष्टीमुळे भुईसपाट होतात की काय? अशी शंका देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे. दरम्यान चालू वर्षी पाऊस वेळेत सुरू झाला; शेतकऱ्यांच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढल्या. परंतु पावसाने सध्या दुर्वाधार हजेरी लावल्याने खरिपाची पिके अनुक्रमे बाजरी; कपाशी; उडीद; तुर उत्पन्नाची मका इत्यादी पिके या अतिपावसामुळे हातची जातात की काय? त्यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर सध्या उभा आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षी वेळेत पावसामुळे खरिपाची पिके जोमात होते. परंतु सततच्या पावसाने काटनीला आलेली बाजरी अक्षरशा भोईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. तर कपाशीची पाने पिवळी पडले आहेत. कपाशीच्या पाकळ्या ही गळून जाताना दिसत आहेत. त्यामुळे चालू वर्षी जोमात आलेल्या या खरिपाच्या पिकातून भरघोस उत्पन्न मिळण्याची घोर निराशा शेतकऱ्यांना होताना दिसते. 

        दरम्यान या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक शेतकऱ्यांनी या खरिपाच्या पिकांचे एक रुपया प्रमाणे पिक विमा भरले. नुकसान झालेल्या शेती पिकाचे अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आमच्या खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करावेत; अशा विनवण्या केल्या. परंतु कृषी विभागाकडून मात्र पंतप्रधान कृषी विमा फ्री टोल क्रमांक 14 447 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सांगितले जाते. अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषी विमा कार्यालयाशी संपर्क साधला असता या सर्व लाईन्स व्यस्त असल्याचे शेतकऱ्यां कडून समजते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे फोन उचलले जातात व त्यांच्याकडून राज्य; जिल्हा व तालुका आणि गाव इत्यादींची माहिती घेतली जात आहे. परंतु पुढे या नुकसानीची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे खरीप पिकांचे पंतप्रधान कृषी विमा उतरून देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नसल्याने शेतकऱ्यांमधून या पंतप्रधान कृषी विमाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद