29 ऑगस्ट रोजीच्या शासकीय निमशासकीय राज्यव्यापी संपात शिक्षकेतर महासंघ सहभागी होणार राज्य महासचिव पाराजी मोरे

By : Polticalface Team ,26-08-2024

29 ऑगस्ट रोजीच्या शासकीय निमशासकीय राज्यव्यापी संपात शिक्षकेतर महासंघ सहभागी होणार राज्य महासचिव पाराजी मोरे लिंपणगाव( प्रतिनिधी )- 29 ऑगस्ट 2024 रोजी च्या शासकीय; निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्य संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपामध्ये व्हावे असे; आवाहन राज्य शिक्षकेतर महासंघाचे राज्य महासचिव पाराजी मोरे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीने सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी; या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी दिनांक 29 ऑगस्ट 20२४ रोजी संपाची हाक दिलेली आहे. प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद सर्व मागण्यांबरोबरच राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना १२/ 24 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक १ ऑक्टोबर 2006 पासून पूर्व लक्षी प्रभावाने लागू करावी या मागणीचा समावेश करण्याबाबत राज्य शिक्षकेतर महासंघाने आग्रह धरलेला होता. याबाबत प्रधान सचिव वित्त विभाग यांची वेळ निश्चित करून चर्चा घडवून मार्ग काढण्याबाबत दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी महासंघास आश्वासित केलेले आहे. पुढे या निवेदनात जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे यांनी म्हटले आहे की; महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघ हा मध्यवर्ती कर्मचारी संघटना समन्वय समितीचा अधिकृत सदस्य आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून काढलेल्या संपामध्ये शिक्षकेतर महासंघाने सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढे या निवेदनात महासचिव पाराजी मोरे यांनी आणखी म्हटले आहे की; राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवरील अध्यक्ष; सचिव व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या संपात सक्रिय सहभाग घेऊन शाळेतील शिक्षकांचे निवेदनासोबत आपले निवेदन सादर करावीत. संप काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी; संपूर्ण संप शांततेच्या मार्गाने पार पाडावा. व सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यास शासनास भाग पाडावे असे आवाहन राज्य शिक्षकेतर महासंघाचे राज्य अध्यक्ष वाल्मीक सुराशे; कार्याध्यक्ष केशव पाटील व महासचिव शिक्षकेतर महासंघाचे पाराजी मोरे राज्य उपाध्यक्ष राजू पठाण जिल्हा शिक्षकेतर महासंघाचे ज्यष्ठ मार्गदर्शक समशेर भाई पठाण यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.