माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यांना चेक बाउन्स प्रकरणी सहा महिन्याची न्यायालयाने दिली शिक्षा
By : Polticalface Team ,01-09-2024
करमाळा प्रतिनिधी
गुळसडी तालुका करमाळा येथील माजी सरपंच तसेच
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप-सभापती दत्तात्रय रामदास अडसूळ यास चेक बाऊन्स प्रकरणी सहा महिने शिक्षा आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- चा दंड -
उसनवार घेतलेली रक्कम परत देण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याने करमाळा न्यायालयातील खटल्यात न्यायाधीश श्रीमती भार्गवी भोसले यांनी दत्तात्रय रामदास अडसूळ यास ६ महिने तुरुंगवास आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील दगडु कुंडलिक चेंडगे यांनी दत्तात्रय रामदास अडसूळ यास पाच लाख रुपये हातऊसने दिले होते. सदरची हातऊसणे घेतलेली रक्कम दगडु चेंडगे यांना परत देण्यासाठी दत्तात्रय अडसूळ यांनी दगडु चेंडगे यांना दिलेला धनादेश न वटल्याने दगडु चेंडगे यांनी ॲड जयदिप देवकर यांच्या मार्फत करमाळा न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्याची सुनावणी न्यायाधीश भार्गवी भोसले यांच्या समोर होऊन न्यायाधीश यांनी सदर धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास अडसूळ यास दोषी धरुन सहा महिने तुरुंगवास आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- च्या दंडाची शिक्षा ठोठावली. फिर्यादी दगडु चेंडगे यांच्याकडून ॲड जयदिप देवकर यांनी तर आरोपी दत्तात्रय अडसूळ कडून ॲड बी.आर.राऊत यांनी काम पाहिले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी