By : Polticalface Team ,02-09-2024
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात सर्जा राजांचा अर्थात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण समजला जाणारा बैलपोळा मोठ्या उत्साहमय वातावरणात साजरा करण्यात आला
करमाळा तालुक्यातील विशेषता मांगी, पुनवर, वडगाव, जातेगाव, हिसरे आवाटी पांडे सालसे परिसरात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण समजला जाणारा बैलपोळा अर्थात सर्जा राजाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदा अगदी वेळेवर आणि चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या बरोबरीने वर्षभर शेतात राब राबणाऱ्या सर्जा राजाचा बैलपोळा यांना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला करमाळा तालुक्यातील वडगाव येथील रहिमान पठाण या 110 वर्ष वय असणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्यांने बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला याबाबत वयोवृद्ध आजोबा पठाण बोलताना म्हणाले की आमचा बैल पोळा यंदा पाऊस वेळेवर झाल्याने मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला वेळेवर पाऊस झाल्याने शेतातील पिके देखील वेळेवर आली तसेच जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न देखील या पावसाने मिटला एकंदर पाहता बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला असल्याची माहिती पठाण यांनी बोलताना दिली
शेतकऱ्यांचा आवडता व महत्त्वाचा सण बैलपोळा हा करमाळा शहर तसेच तालुक्यात आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला
वाचक क्रमांक :