संतती; संपत्ती आणि संस्कार या जीवनाला संजीवनी ठरतात-- ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज

By : Polticalface Team ,07-09-2024

संतती; संपत्ती आणि संस्कार या जीवनाला संजीवनी ठरतात-- ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज लिंपणगाव (प्रतिनिधी )-जीवन जगत असताना जीवनातील संतती; संपत्ती आणि संस्कार या तीन गोष्टी महत्त्वाचे आहेत. या तीन गोष्टी सुखी असल्या तरच जीवन सुसह्य व आनंदी राहते ;असे मौलिक विचार ज्येष्ठ कीर्तनकार मधुसूदन शास्त्री महाराज यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. लिंपणगावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सोपानराव कुरुमकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित प्रवचन रुपी सेवेत उपस्थितांना संबोधित करताना ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज पुढे म्हणाले की; शब्द हे शास्त्र आहे. तेच शब्द शस्त्र सुद्धा आहे. उचित शब्द वापरला तर मंगलमय होते. त्यामुळे शक्यतो तरुण पिढीने ज्येष्ठ व्यक्तींपुढे नम्रपणा ठेवावा. ज्येष्ठांकडून उज्वल भविष्यासाठी योग्य संस्कारिक मार्गदर्शन घ्यावे. संस्कार हे सर्वात मोठी संपत्ती आहे. शास्त्री महाराज यांनी पुढे आणखी म्हटले आहे की; आत्मा हे अमर असतो. प्रत्येकाने जीवन जगत असताना कीर्तीवंत व्हावे; आशीर्वाद मिळवण्यासाठी जन्मदात्या आई वडिलांची वृद्धापकाळात सेवा महत्त्वाची आहे त्यांचा विसर होता कामा नये; जीवनामध्ये चोऱ्यामऱ्या व कुणाच्या घराला आगे लावू नये. कर्म करताना चांगले करायचे असेल तर वाईट कुणाचेही करू नये. ते तत्व लिंपणगावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सोपानराव कुरुमकर यांनी पाळले त्यांचेच अनुकरण इतरांनीही घ्यावे. असे सांगून शास्त्री महाराजांची पुढे म्हणाले की; वर्ष श्राद्ध का करावे? पितृ श्राद्ध का घालावे? भरणे श्राद्ध का करायचे? याविषयी उपस्थित भाविकांना सखोल असे मार्गदर्शन केले. शास्त्री महाराज यांनी पुढे यांची म्हटले आहे की; सामाजिक व राजकीय क्षेत्रात सोपान अण्णा कुरुमकर यांनी सतत सत्कार्य करत सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. 32 ते 33 वर्षांपूर्वी सोपानराव कुरुमकर यांनी गावच्या सिद्धेश्वर महाराजांच्या सप्ताह मंडळाचा पाया रोवला. आज तो तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्श युक्त सप्ताह ठरला आहे. याबरोबरच त्यांनी सत्तेच्या कालावधीत ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरा सभोवताली भव्य दिव्य तटबंदी बांधून आज हे मंदिर सर्व भाविकांसाठी एक आकर्षण ठरले आहे. असे सांगून शास्त्री महाराजांनी यांनी दिवं. सोपानराव कुरुमकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश ज्योत टाकला. या सोहळ्यास आमदार बबनराव पाचपुते; नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस; राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा; ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते; घनश्याम अण्णा शेलार; माजी आमदार राहुल जगताप; राजेंद्र म्हस्के; सुभाषराव शिंदे; दीपक पाटील भोसले; राकेश पाचपुते; विठ्ठलराव काकडे; अरुणराव पाचपुते; गणपतराव काकडे; हरिभाऊ कुरुमकर; अण्णासाहेब शेलार; जिजाबापू शिंदे; केशवराव मगर; संदीप नागवडे; सुवर्णाताई पाचपुते; ह भ प संजय महाराज गिरमकर; ह भ प अविनाश महाराज साळुंखे आदींसह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन पोपटराव माने यांनी केले. आभार प्रवीण कुरुमकर यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष