By : Polticalface Team ,08-09-2024
धनंजयचा खरा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आला आहे. पूर्वी फक्त वर्षा उसगांवकरने त्याला ओळखले होते, परंतु आता प्रेक्षकांनीही त्याच्या खोट्या खेळीची दखल घेतली आहे. धनंजयला स्वतः कॅप्टन व्हायचं होतं, परंतु घरातील सदस्यांकडून त्याला पाठिंबा मिळाला नाही. सूरजला कॅप्टन झाल्याचे पाहून धनंजयला खूप कमीपणा वाटला, आणि त्याचा चेहरा बिग बॉसच्या कॅमेऱ्यातून स्पष्टपणे दिसत होता.धनंजयची खोटी भावना आणि निरागस सूरजला विरोध करणं प्रेक्षकांच्या मनात खूपच खटकले आहे. धनंजयने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
"महाराष्ट्राचा लाडका कपटा धनु," असे म्हणत प्रेक्षकांनी त्याच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. सूरजला सपोर्ट करणारे पॅडी, अभिजीत, वर्षा, निक्की, आरबज, घनशाम, आर्या, आणि विरोधात खेळूनही जान्हवी, वैभव यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु धनंजयच्या या स्वभावामुळे त्याच्या विरोधात जनभावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे पुढील भागांमध्ये प्रेक्षक त्याला कसे सामोरे जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचक क्रमांक :