By : Polticalface Team ,08-09-2024
                           
              जनआधार न्युज 
भिमसेन जाधव मो9112131616
 
छोटा पुढारी नावाने लोकप्रिय असलेला घनःश्याम दरवडे बिग बॉसमधून बाहेर 
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
बिग बॉस मराठीमधील सहावा आठवडा सुरु झालाय. सहाव्या आठवड्यात छोटा पुढारीला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं आहे. या आठवड्यात एकूण सात जण नॉमिनेशनमध्ये होते. छोटा पुढारीसोबत या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट होते.  घनश्याम दरोडे ( Ghanshyam Darode), आर्या जाधव (Arya Jadhav), सूरज चव्हाण (Suraj Chavan), धनंजय पोवार (Dhananjay Powar), निक्की तांबोळी (Nikki Tamboli), अरबाज पटेल (Arbaaz Patel) आणि अभिजीत सावंत (Abhijit Sawant) हे सात सदस्या या आठवड्यात नॉमिनेट होते. त्यापैकी घनःश्याम दरवडेचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.
असा होता छोटा पुढारीचा बिग बॉसमधील प्रवास
छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरवडे सहा आठवडे बिग बॉसच्या घरात प्रवास संपला आहे. घनःश्याम पहिले दोन आठवडे चांगला खेळत होता. रितेशभाऊंनीही त्याचं कौतुक केलं. पण नंतर मात्र घनःश्यामचा खेळ भरकटला. तो निक्की, अरबाज, वैभवच्या मागे मागे जाऊ लागला. त्यामुळे घनःश्यामचा खेळ बिघडला. त्याने अनेकदा पॅडी, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर यांना उलट उत्तर दिली. त्यामुळे सर्वांना त्याच्यावर राग होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी घनःश्यामने भाऊच्या धक्क्यावर टास्क खेळायला नकार दिला. त्यामुळे रितेशभाऊंनाही त्याचा राग आला होता. मी तुमच्याशी बोलणार नाही असं म्हणत रितेश घनःश्यामशी बोलत नव्हता.
घनःश्यामने जाताना सूरजला दिला पाठिंबा
घनःश्यामने बाहेर जाण्याची घोषणा झाल्यावर अरबाज, निक्की आणि सर्वांना दुःख झालं. जान्हवी सुद्धा रडत रडत बेडरुम एरियात गेली होती. घनःश्यामने जाताना वर्षा ताईंना नमस्कार केला. याशिवाय सर्वांची माफी मागितली. जाताना घनःश्यामने त्याने जमवलेली करन्सी सूरज चव्हाणच्या नावावर केली. अशाप्रकारे घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्यांचा बिग बॉसचा प्रवास केला. घनःश्यामच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झालेलं दिसलं.
 
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष