By : Polticalface Team ,09-09-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी माजी मंत्री तथा श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार श्री बबनराव पाचपुते यांचा 70 वा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले होते यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये जवळ पास 500 पेक्षा अधिक युवक व महिलांनी रक्तदान केले आमदार बबनराव दादा पाचपुते साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना. मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.अजित दादा पवार साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्वांनी दादांना फोन द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार राहुल दादा कुल, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार सुधीरजी तांबे यांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदचे माजी सदस्य सचिन भाऊ जगताप , भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे,पंचायत समितीचे माजी सभापती हरीदास शिर्के, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष, सुदामराव नवले ,भरतनाना नवले ,यांसह अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूरचे दादांचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री.कुमार चेन्ना यांनी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर येथे गरिबांना अन्नदानाचा उपक्रम केला. दिवसभर हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून दादांना शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :