शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता चारित्र्य पडताळणी का राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुराशे राज्य शिक्षकेतर महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
By : Polticalface Team ,10-09-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)--राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता चारित्र्य पडताळणी का? असा सवाल राज्य शिक्षकेतर महासंघाचे राज्यअध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे सवाल उपस्थित केला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात राज्य अध्यक्ष श्री सुरासे यांनी म्हटले आहे की? बदलापूर येथील घटना ही अत्यंत निषेधार्थ आहे. राज्य शासन अशी घटना घडली की तातडीने आदेश काढायचा व त्याची अंमलबजावणी तातडीने आणि काटेकोरपणे झाली पाहिजे; कॅमेरे बसवा? अन्यथा मान्यता काढणार? अशा प्रकारचे वाक्य करणे म्हणजे राज्यातील सर्व शाळेत सुरक्षा होईल का ?याचा विचार नको का? चारित्र्य पडताळणीला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विरोध नाही. पण शिक्षकेतर कर्मचारीच का? शासन तिजोरीतील वेतन घेणाऱ्या प्रवर्गातील सर्वच घटकांची चारित्र्य पडताळणी झाली पाहिजे. असे सांगून श्री सुरासे यांनी पुढे म्हटले आहे की; मुंबई उच्च न्यायालयाच्या मा.न्यायमूर्ती मा रेवती मोहिते यांनी सुद्धा अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अधिनियम 2009 नुसार शिक्षण देण्याची राज्य शासनाची संपूर्ण जबाबदारी असताना आज राज्यातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना काय हवे? काय नव्हे? शाळांमध्ये स्वच्छतागृह आहे का? पिण्याचे पाणी आहे का? वापराचे पाणी आहे का? शैक्षणिक साहित्य आहे का? पुरेसा शिक्षक वर्ग आहे का? याची विचारणा न करता आज राज्यात खाजगी शिक्षण संस्था कशा शाळा चालवीत आहेत; हे फक्त त्यांनाच माहित आहे. असे सांगून या निवेदनात श्री सुराशे यांनी आणखी पुढे म्हटले आहे की; आज राज्यातील खाजगी शाळेत शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी डिसेंबर 2020 पासून कायम स्वरूपी बंदी घातली असून; आहे; त्या पदांवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. ही पदे शासनाने खाजगी कंपनीमार्फत भरण्याचा घाट धरल्याने अशा घटना घडत आहे. या प्रकरणाला संपूर्णपणे शासन जबाबदार आहे. यामुळे बालशिक्षण व बाल आरोग्य धोक्यात आले आहे.
कायम शिक्षकेतर कर्मचारी कधीही अशी कृती करत नाही. त्याला त्याच्या सेवेची व कुटुंबाची जबाबदारी असते. याची जाणीव त्यांना कायम असते. चारित्र्य पडताळणीसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांना वेठीस धरू नये. चारित्र्य पडताळणी करून सुरक्षा होईल का? याचा विचार होणे गरजेचे आहे. जाणीवपूर्वक कायम असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर राज्यभर आंदोलन करण्यात येतील; असा इशारा राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे; केशव पाटील; प्रमोद पाटील; राजेंद्र बाविस्कर; अविनाश चडगुलकर; ज्योत्स्ना कडू; राज मोहम्मद पठाण; अरविंद शेंडे; लीलाराम जेसुजा; सोमनाथ धात्रक; आसाराम शेळके; अरुण शिंदे; विजय निकम; पाराजी मोरे; समशेर भाई पठाण आदींनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले असून; या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी चे निवेदन राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.