Suraj Chavan :  आयुष्यात टोकाचा निर्णय घेण्याआधी सूरज चव्हाणला आठवा; व्हिडीओ क्लिप होतेय व्हायरल...

By : Polticalface Team ,10-09-2024

Suraj Chavan :  आयुष्यात टोकाचा निर्णय घेण्याआधी सूरज चव्हाणला आठवा; व्हिडीओ क्लिप होतेय व्हायरल...

जन आधार न्युज

भिमसेन जाधव

मो.9112131616 

 Suraj Chavan :  जेव्हा कधी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार कराल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा असे आवाहन करणारी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्य रील स्टार सूरज चव्हाणने (Suraj Chavan) छाप सोडली आहे. गुलिगत धोका म्हणून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरजची एन्ट्री झाल्यानंतर  अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर सूरजने घरातील वावर आणि आपल्या स्ट्रगलबद्दल इतर सदस्यांना सांगितल्यावर प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.अनेकजण सूरजला पाठिंबा देत आहे. तर, दुसरीकडे एका कीर्तनकारांनीदेखील सूरजचे कौतुक केले आहे. जेव्हा कधी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार कराल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा असे आवाहन त्यांनी केले. सध्या याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सूरजच्या स्वभावावर आणि त्याने आयुष्यात केलेल्या संघर्षाला  प्रेक्षकांनी दाद दिली आहे. अनेकांनी सूरज चव्हाणसाठी आपण बिग बॉस मराठीचा हा सीझन पाहत असल्याचे म्हटले आहे. छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने ग्लॅमरस जगात आपले स्थान मिळवले आहे. बिग बॉस मराठीमधील माजी स्पर्धकांसह इतर कलाकारांनीदेखील त्याला पाठिंबा दिला आहे. 

सूरजचे कौतुक करणारी व्हिडीओ क्लिप व्हायरल...

वारकरी सांप्रदायातून सूरजला पाठींबा मिळत असून त्याच्या  खेळाचे कौतुक होत आहे. कीतर्नकार प्रा. निलेश महाराज कोरडे यांच्या कीर्तनातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते सूरजचे कौतुक करताना दिसत आहेत. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणतात की, बिग बॉस चांगलं की वाईट हा प्रश्न बाजूला ठेवा. पण इथे बसलेल्या सर्वांना एक वाक्य सांगतो आयुष्यात कधीही आत्महत्येचा विचार मनात आला तर त्या गोलीगत सूरज चव्हाणकडे पाहा आणि कोरोना काळात स्वत:ला संपल्याची जाणीव ज्याला झाली होती तो डीपीदादा म्हणजेच धनंजय पोवार आठवून पाहा. वडील गेले तेव्हा सूरज गोट्या खेळत होता. तेव्हा लोकांनी त्याला येऊन सांगितलं की, तुझे वडील गेले. त्यानंतर त्याने गोट्या तशाच खिशात घातल्या आणि बापाचं शेवटचं तोंड पाहिलं. बिचाऱ्याला तेव्हा काही कळतही नव्हतं. त्यानंतर आईच्या उपचाराला पैसे मिळाले नाहीत. त्याने सगळ्यांकडे पैसे मागितले. पण तेव्हा कोणी पैसे दिले नाही. तेव्हा खोकून खोकून आई गेली पण तो काही करू शकला नाही, असे त्यांनी म्हटले.

कीतर्नकार प्रा. निलेश महाराज कोरडे यांनी पुढे सांगितले की, फक्त गणपती बसवायचा म्हणून सूरज तीन दिवस कामाला गेला आणि काबाडकष्ट केले. गणपतीपुरते पैसे जमा केले. पण वेड्याबरोबर काय राहायचं म्हणून गावातल्यांपैकी कुणी गणपती बसवायला आलं नाही. पण त्याने एकट्याने गणपती बसवला आणि त्याच गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाहा. तिसऱ्या आठवड्यात तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा जीवन संपल्याची जाणीव होईल तेव्हा एकदा बिग बॉस हा सीझन आठवून पाहा. 

सूरजचे कौतुक करणारी ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सूरजच्या स्ट्रगलचे कौतुक केले असून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं असल्याचे सांगण्यात आले आहे. 


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष