चिंभळेगावच्या सहा उच्च पदस्थ भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा संपन्न

By : Polticalface Team ,11-09-2024

चिंभळेगावच्या सहा उच्च पदस्थ भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा संपन्न

 लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावचे भूमिपुत्र व चिंभळे माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदेश गायकवाड यांची इन्स्पेक्टर ऑफ मेजर मेट्रोलॉजी; सुप्रिया गायकवाड यांची महिला पोलीस पदी; श्रुतिका गायकवाड एमबीबीएस साठी प्रवरानगर येथे निवड; तुषार लगड यांची वनरक्षकपदी; गौरव गायकवाड यांची डॉक्टरपदी संभाजीनगर येथे निवड; ओंकार गायकवाड यांची आयटीआय कॉलेज गांधीनगर येथे निवड झाल्याने या सहा विद्यालयाच्या माजी गुणवंत विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रात निवड झाल्याने चिंभळे माध्यमिक विद्यालय व हरित परिवार संचलित ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय चिंभळे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंभळे माध्यमिक विद्यालयात भव्य दिव्य असा सन्मान सोहळा पार पडला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री बी के लगड सर हे होते.

     याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब सावंत यांनी विद्यालय स्थापनेपासूनचा चढता आलेख उपस्थितांसमोर मांडला. 

    यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदेश गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले की; जिथे ज्ञानाचे धडे व संस्कार मिळाले त्या शाळेकडून उच्च पदस्थ झाल्यानंतर सन्मान होत असल्याने आनंदात मोठी भर पडली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी होतो. ही प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी भविष्यात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी पालक व शिक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन घ्यावे; असे सांगून आपले जीवन कसे घडले याविषयी सविस्तर माहिती विशद केली. 

      याप्रसंगी सुप्रिया गायकवाड महिला पोलीस पदी निवड होताना म्हणाल्या की; माझी जिद्द होती ती मी पूर्ण केली. विद्यार्थ्यांनी देखील चांगले मन लावून अभ्यासासाठी कष्ट घेतले तर फळ निश्चित मिळते. प्रत्येकाच्या अंगी जिद्द असायला हवी यश हमखास मिळते हे माझ्या बाबत उदाहरण आहे असे सांगितले. 

 याप्रसंगी श्रुतिका गायकवाड यावेळी म्हणाल्या की; मला देखील डॉक्टर व्हायची इच्छा होती. ती मी पूर्ण केली. माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते ते मी पूर्ण केले. मोठे व्हायचे आहे असेल तर कष्ट करावेच लागतात असे सांगितले. 

     याप्रसंगी कुंडलिक शिर्के; सचिन गायकवाड; शहाजी गायकवाड; प्रा ज्ञानदेव गायकवाड आदींनी विविध क्षेत्रात उच्च पदावर या सहा चिंभळे गावच्या भूमिपुत्रांनी विद्यालयाचे नाव जिल्ह्यात सुवर्णाक्षरांनी लिहावे असे कर्तुत्व केल्याचे सांगितले. 

      ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री बी के लगड सर हे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की; आजचा सन्मान सोहळा हा विद्यालय व गावच्या दृष्टीने आनंदाचा सोहळा आहे. या विद्यार्थ्यांचे यशामागे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंच्या पुण्याईतून मिळाले आहे. सहकार महर्षी बापूंनी ग्रामीण भागात विद्यालय स्थापन केले त्यातून अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. असे सांगून श्री लगड आणखी पुढे म्हणाले की गावांमध्ये वाचनालय; शाळा; आरोग्य अशा सुविधा ज्या गावांमध्ये आहेत. तिथे संस्कारित व ज्ञानवंत मुले घडतात. ही सर्व सुविधा केंद्र चिंभळे गावात आहेत. असे सांगून श्री लगड पुढे म्हणाले की; सद्यस्थितीला मुली अभ्यासात अग्रेसर आहेत. चिंभळे गावची प्रगती ही चांगल्या दिशेने चालू आहे. शिक्षण संस्था व गावच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थी हे भावी राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. आपला पाल्य उच्च पदस्थ अधिकारी झाला पाहिजे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. स्पर्धेमध्ये मुलींबरोबर मुलांनी टिकली पाहिजे. आई वडिलांनी केलेल्या कष्टाची प्रत्येकाला जाणीव असावी. भरपूर अभ्यास करून जिद्द व ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. ज्ञानसागर वाचनालयाने स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करून दिले. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना भरीव यश संपादन करता आल्याचे श्री लगड यांनी यावेळी सांगितले. 

      यावेळी व्यासपीठावर संस्थेचे निरीक्षक बी के लगड; कुंडलिक शिर्के; नागवडे कारखान्याचे माजी संचालक रमेश गायकवाड; पत्रकार नंदकुमार कुरूमकर, संजू काका गायकवाड; रावसाहेब गायकवाड; जयसिंगराव गायकवाड; हाशम भाई हवालदार; महेंद्र शेठ गायकवाड; मुख्याध्यापक भाऊसाहेब सावंत; सुदाम दिघे सर; चंद्रकांत गायकवाड; संजय गायकवाड आदी उपस्थित होते. 

        सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक राम मगर यांनी केले. तर आभार उपशिक्षक ठोंबरे सर यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.