मोदक मिळताच सूरजला आठवला बाप्पा! केलं असं काही की नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

By : Polticalface Team ,11-09-2024

मोदक मिळताच सूरजला आठवला बाप्पा! केलं असं काही की नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

जनआधार न्युज 

भिमसेन जाधव 

मो 9112131616 यंदाच्या सीझनप्रमाणे त्यातील स्पर्धकही चांगलेच चर्चेत येत आहे. प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांचा घरातील वावर त्यावर नेटकरी सोशल मीडियाच्या आधारे व्यक्त होताना दिसतात. त्यातच प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगलीये ती म्हणजे गुलिगत धोका फेम सूरज चव्हाणची. रिलस्टार सूरज चव्हाणने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळतंय. अशातच सोशल मीडियावर सूरजचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं  बिग बॉस मराठी च्या यंदाच्या सीझनप्रमाणे त्यातील स्पर्धकही चांगलेच चर्चेत येत आहे. प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांचा घरातील वावर त्यावर नेटकरी सोशल मीडियाच्या आधारे व्यक्त होताना दिसतात. त्यातच प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगलीये ती म्हणजे गुलिगत धोका फेम सूरज चव्हाणची. रिलस्टार सूरज चव्हाणने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळतंय. अशातच सोशल मीडियावर सूरजचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 

दरम्यान, सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना बिग बॉस च्या घरातही गणरायाचं आगमन झालं आहे. अशातच लाडक्या गणराच्या  स्वागतासाठी बिग बॉस चं अख्खं घर सज्ज झाल्याचं पाहायला मिळालं. काल रविवारी बिग बॉस मराठी च्या भाऊच्या धक्क्यावर गणेशोत्सव स्पेशल एपिसोड पार पडला.

इन्स्टाग्रामवर सूरजने स्वत: हा व्हिडीओ  शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज घरातील सगळ्या सदस्यांसाठी मोदकाचा प्रसाद घेऊन येतो. प्रसादाचा वाटप झाल्यानंतर घरातील इतर स्पर्धक मोदकाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. पण, सूरजला या क्षणी बाप्पा आठवतो. आपल्याला प्रसादात मिळालेला मोदक तो स्वत न खाता  बाप्पाच्या पुढे नैवेद्य म्हणून ठेवतो.  त्यानंतर तो गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. सूरजच्या या कृतीचं नेटकरी खूप कौतुक करत आहेत. शिवाय रितेश देखील  सूरजचा साधेपणा पाहून भारावला आहे. 

दरम्यान, नवीन कॅप्टन येईपर्यंत सूरज सध्या घराचा कॅप्टन असणार आहे. या पर्वाच्या सुरूवातीचे दोन आठवडे सूरज अगदीच शांत होता. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेशने त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत केली.आता मात्र, सूरज पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. 


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.