श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

By : Polticalface Team ,13-09-2024

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १३ सप्टेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व कॅनॉल ग्रुप मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेश फेस्टिवल या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. यवत रेल्वे स्टेशन ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी गुरुवार दि १३ सप्टेंबर रोजी प्रथमच आयोजन करण्यात आले होते. लय भारी महाहोम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सौजन्य शागिरभाई मुनीर शेख. व श्री शिवाजीबापू दत्तात्रय दोरगे तसेच सौ कांचन राहुल कुल यांच्या हस्ते नारळ फोडून खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी हभप नानासाहेब दोरगे महाराज हभप दिपक मोटे महाराज. यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुभाष बांपु यादव. सदस्य राजेंद्र जगताप. सदस्य सुभाष यादव. आदी मान्यवर उपस्थित होते श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व कॅनॉल ग्रुप मित्र मंडळा च्या आयोजित श्री गणेश उत्सव फेस्टिवल या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सौ कांचन कुल यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली होती. मंडळाच्या वतीने ह भ प नानासाहेब दोरगे महाराज यांच्या हस्ते. सौ कांचन कुल. यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देण्यात आली. या प्रसंगी बोलताना कांचन कुल म्हणाल्या लय भारी महाहोम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी सहभाग घ्यावा आणि पैठणी मिळवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला उपस्थित महिलांना दिला तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या दौंड तालुक्यातील विकासात्मक कामांबाबत दादांनी बेबी कॅनॉलच्या कामासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ मिळत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकार सत्तेवर आलं तर दौंड तालुक्यातील विकासात्मक कामे गतीने होतील असे आश्वासन त्यांनी. लय भारी महाहोम मिनिस्टर या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना दिले लय भारी महाहोम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाची पैठणीचे मानकरी सौ कोमल सोमनाथ खरात. यानी मिळाली असुन सौ दिपाली वेताळ सौ फडतरे मॅडम सौ सोनाली यादव.या तीन महिला पैठणीचे मानकरी ठरल्या आहेत. लय भारी महाहोम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा महाराष्ट्राचे लाडके भाऊजी प्राचार्य तेजस टेंगले यांनी अतिशय सुंदर व उत्कृष्ट प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी उपस्थित यवत पंचक्रोशीतील सर्व महिलांना श्री विठ्ठल रुक्मिणी च्या सुंदर मूर्ती देण्यात आली. शुक्रवार दि १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता सायली पाटील भारदार लावण्याचा जंगी कार्यक्रम होणारा असून शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भारुडकार झी टॉकीज फेम ह भ प चंदाताई तिवारी पंढरपूर तसेच रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता जगप्रसिद्ध जादूगर ईश्वर जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यवत पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी व सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आव्हान श्री हनुमान मित्र मंडळ व कॅनॉल मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रसंगी कॅनाॅल ग्रुप मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र जगताप (मा. ग्रा. सदस्य यवत) उपाध्यक्ष..श्री संतोष मुळीक श्री हनुमान तरुन मंडळ अध्यक्ष..हभप नानासो दोरगे महाराज उपाध्यक्ष..श्री नामदेव घिगे प्रामुख्याने उपस्थित होते यवत पंचक्रोशीतील गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश फेस्टिवल या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.