न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

By : Polticalface Team ,14-09-2024

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा. लिंपणगाव प्रतिनिधी : शनिवार 14 सप्टेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री लेंडे सर प्रमुख वक्त्या श्रीमती कोरडे मॅडम व विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यानी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या श्रीमती अर्चना कोरडे यांनी हिंदी भाषेचे महत्व व हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा कसा दिला याविषयी सविस्तर माहिती सांगितली व सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कशाला विठ्ठल लेंडे यांनी हिंदी साहित्याचा इतिहास आणि संत कबीरांचे दोहे यांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे , पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे, विद्यालयातील सर्व सेवक बंधू भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी जंजाळ व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तेजस्विनी डोंगरे या विद्यार्थिनीने केले. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी