मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

By : Polticalface Team ,14-09-2024

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण ! श्रीगोंदा - शालेय उपक्रमांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अधिक सहभागी करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – २ ही मोहीम सुरू केली.या निमित्ताने येथील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा जिल्हास्तरीय परीक्षण संपन्न झाले. या परीक्षणात विद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली.यात विद्यालयातील पायाभूत सुविधा शासन ध्येयधोरण अंमलबजावणी व शैक्षणिक संपादणूक अशा तीन भागात मुल्यांकन करण्यात आले. यामध्ये आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन, स्वच्छता विषयक स्थिती, सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन, आधार वैधता, सरल प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, युडायस प्रणाली वरील नोंदी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग, महावाचन चळवळ, मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ/गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग अनुपालन, शासकीय कार्यक्रमातील सहभाग (उदा. मेरा देश मेरी माटी, ग्रंथालयांचा उपयोग, पाठयपुस्तक,विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री-पुरुष समानता, मतदान प्रचार प्रसार, विविध महत्वपूर्ण विषयांच्या शपथ कार्यक्रम, गणवेश वाटप, तंबाखुमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मुलन, आनंददायी शनिवार, व्यवहारज्ञान, कृषीघटक इ.) यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती,सवलती, योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदान प्रचार प्रसार,निवडणूक साक्षरता मंच व स्काऊट गाईड उपक्रम इ अशा विविध उपक्रमांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी करण्यासाठी पथक प्रमुख म्हणून आकाश दरेकर (उपशिक्षणाधिकारी-माध्य.) यांनी काम पहिले, तर प्रदीप शिंदे ( गटशिक्षणाधिकारी-कर्जत), एन.के.कुलट ( विस्तार अधिकारी –मुख्यालय ), विनेश लाळगे ( विस्तार अधिकारी – पारनेर) पथक सदस्य म्हणून काम पहिले. सकाळी शालेय प्रार्थनेपासून ते दु.३ वाजेपर्यंत त्यांनी विद्यालयाच्या सर्वच घटकांची बारकाईने तपासणी करून मुल्यांकन केले. या पथकातील सर्व मान्यवरांचे बाबासाहेब भोस (मा.मँनेजिंग कौन्सिल सदस्य,r.शि.सं. सातारा) यांनी परीक्षणानंतर पुस्तक भेट देऊन आभार मानले. पथक प्रमुख म्हणून आकाश दरेकर यांचे हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे, विज्ञान शिक्षक विलास दरेकर, गुरुकुल प्रमुख विलास लबडे, गुणवत्ता कक्ष प्रमुख सुधीर साबळे,कलाशिक्षक संतोष शिंदे व कल्याण उल्हारे, विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर सेवक यांनी सर्व शालेय उपक्रमाची माहिती देण्यासाठी प्रभावी सहकार्य केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.