इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

By : Polticalface Team ,17-09-2024

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

इंदापूर जनआधार 

भिमसेन जाधव 

मो.9112131616 

इंदापुर :लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या संकटसमयी मदतीला धावून आलेल्या पुणे जिल्हा बँक संचालक व तालुक्यातील मातब्बर नेते आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करत जगदाळे समर्थकांकडून हलचाली वाढल्या आहेत. इंदापूरातून एक शिष्टमंडळ शरद पवारांना बारामतीत भेटल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दुसरीकडे मी सध्या भाजपमध्येच आहे, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी सावध भूमिका घेतली असली, तरी कार्यकर्त्यांचा मात्र तुतारी हातात घेण्यासाठी हर्षवर्धन पाटलांकडे आग्रह कायम आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी इंदापुरातून शिष्ट मंडळ शरद पवारांच्या भेटीला गेले होते.

शरद पवारांनी यासाठी आमचे म्हणणे ऐकून घेवून निर्णय जाहीर केला नसला, तरी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे इंदापूर शहरांमध्ये काही ठराविक बोटावर मोजण्याएवढी मंडळी बॅनरबाजी करून अफवा पसरवत फार्स करत असल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात येत होती. गेल्या आठवड्याभरात इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील नेत्यांनीही शरद पवार यांची भेट घेत आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती.


एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर विधानसभेसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची जोरदार मोर्चेबांधणी पदाधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.. तर दुसरीकडे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी अप्रत्यक्षपणे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर केल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी अद्याप जाहीर न केलेल्या भूमिकेमुळे शरद पवार गटात पाटील यांचा प्रवेश ही सध्या तरी फक्त चर्चा असल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्य असणारा मतदार असल्याचा दावा थेट कार्यकर्त्यांकडून केला जात असला, तरी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची लोकसभेच्या निकालानंतरची ताकद पाहता शरद पवार इंदापुरात चमत्कार करू शकतात, असे मत सर्वसामान्यांसह जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे महायुतीचे तिकीट नसणे व दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय लांबणीवर जात असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात. आता हर्षवर्धन पाटील हे मुरब्बी राजकारणी असल्याने काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.