By : Polticalface Team ,19-09-2024
जनआधार न्युज (भिमसेन जाधव):
अशोक सराफ यांनी नुकतच सुप्रिया सुळेंच्या लग्नातला एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.
अफलातून कॉमेडी टायमिंगचं आजचे बरेच चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या कॉमेडीमुळे बऱ्याचदा त्यांना खऱ्या आयुष्यातही साधं त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनही लोकांना हसायला येत असल्याचं नुकतच अशोक सराफांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनाच एकदा त्यांच्याकडे बघून हसायला आलं होतं.
अशोक सराफांनी काय म्हटलं?
अशोक सराफांनी या मुलाखतीमध्ये अशोक सराफांना कधी तुमच्या चेहऱ्याकडे बघून लोकांना हसायला आलं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक सराफांनी म्हटलं की, होय असं झालंय. कारण मी भूमिकाच अशा केल्या आहेत की, लोकांना माझ्याकडे पाहून हसायला येतं. विशेष म्हणजे शरद पवारांसारखा गंभीर व्यक्तिमत्वाचा माणूसच माझ्याकडे बघून हसला म्हणजे काय बोलायचं. पुढे त्यांनी म्हटलं की, मी त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होते. पुढे स्टेजवर जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा फोटो काढले आणि शरद पवार माझ्याकडे बघून हसले. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, साहेब तुम्ही अजूनही ओळखता वाटतं मला.
अशोक सराफ दिसणार टिसीच्या भूमिकेत
येत्या 20 सप्टेंबरला नवरा माझा नवासाचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमा अशोक सराफ हे टिसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नाही. पण, यामुळे प्रेक्षकांनी निराश होण्याचं कारण नाही. कारण, प्रेक्षकांच्या लाडका लालू कंडक्टर आता टीसी झाला आहे.