एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

By : Polticalface Team ,19-09-2024

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

श्रीगोंदा प्रतिनिधी :

मागील काही दिवसांपासून एनडीए सरकारच्या नेत्यांकडून देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शरीराला इजा पोहोचविण्याच्या दृष्टीने विधाने येत आहेत.केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि युपी मधील योगी सरकारचे मंत्री रघुराज सिंग यांनी राहुल गांधी यांना आतंकवादी म्हणून संबोधले तसेच दिल्ली भाजपचे नेते तरविंदरसिंह मारवाह यांनी राहुल गांधी यांना इंदिरा गांधींची जशी अवस्था झाली तशी तुमची अवस्था होईल ही धमकी दिली.महाराष्ट्रातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राजकारणाच्या पातळीचा स्तर सोडत राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यासाठी अकरा लाखांचे बक्षीस जाहीर केले तर विदर्भातील भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या जीभेला चटके देण्याची आक्षेपार्ह भाषा वापरली.आज दिनांक १९ सप्टेंबर दिवशी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासमोर एनडीए सरकारच्या नेत्यांविरोधात तक्रार देण्यात आली.एसपी ऑफिस मध्ये सदरील निवेदन पडताळणीसाठी पाठवतो हा शेरा पोलिस निरीक्षक यांनी दिला आहे.राहुल गांधी यांचा अपमान कसाच सहन करणार नाही ही काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची भावना आहे.देशाचे विरोधीपक्षनेते असणाऱ्या राहुल गांधी यांचा अवमान हा देशातील प्रत्येक माणसाचा अवमान आहे ही काँग्रेसची धारणा आहे.राहुल गांधी यांची जनमानसात मिसळून काम करण्याची पद्धत आणि वाढत असलेली प्रसिद्धी एनडीए सरकारच्या नेत्यांना सहन होत नसल्याने ते गरळ ओकत आहेत.

या निषेध आंदोलनासाठी आणि तक्रार देण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितलभैया वाबळे, शहराध्यक्ष मनोहर पोटे, मा. उपनगराध्यक्ष बाळासाहेब शेलार, जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय आनंदकर, कांतिलाल कोकाटे, मुकुंद सोनटक्के,शिवाजी घोडके, योगेश मांडे, भूषण शेळके, विनोद झेंडे, अजीम जकाते, आदेश झराड, संजय कुटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष