By : Polticalface Team ,21-09-2024
पुणे आधार न्युज भिमसेन जाधव आपल्या मतदारसंघातील हडपसर ते झेंडेवाडी हा दिवे घाट पट्ट्यातील भाग व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग वनविभागाच्या हद्दीतील असल्याने त्याची परवानगी मिळवण्यासाठी गेली अनेक दिवस मी व आपण सर्व प्रयत्नशील होतो. आपल्या प्रयत्नाला यश आले असून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग क्र. ९६५ अंतर्गत दिवेघाट ते हडपसर या मार्गाचे चौपदरीकरणासाठी ८१९ कोटींची निविदा मंजूर झाली असून उद्या दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स कॉलेज कर्वेनगर येथे याचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कागदावरील या प्रकल्पाला पूर्णत्वात आणण्यासाठी अमूल्य योगदान देणारे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांचे मनःपूर्वक धन्यवाद..!
संभाजी झेंडे
माजी कलेक्टर हडपसर पालखी मार्ग भूमिपूजन संभाजी सदाशिव अण्णा झेंडे आय ए एस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
वाचक क्रमांक :