By : Polticalface Team ,23-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २३ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र राज्यात २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देश भरात सन- २००५ पासून लागू करण्यात आला असून, शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्र राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमल बजावणीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाय योजना करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
२८ सप्टेंबर हा आंतर राष्ट्रीय माहिती अधिकार दिन असून कायदयातील तरतुदीनुसार, कार्यपध्दती, विविध माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन सर्वत्र हा उपक्रम राबवून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन शासनाच्या निर्देशानूसार साजरा करण्याची मागणी करण्यात आली आहे
या बाबतचे निवेदन विभागीय आयुक्त पुणे विभागचे उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, जिल्हाधिकारी सुहास दिवसे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांसह पोलीस आयुक्त, राज्य माहिती आयुक्त पुणे खंडपीठ, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडे देण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विदयापिठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारीत प्रश्न मंजुषा, चित्रकला.. निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजीत करण्यात याव्यात यासाठी अशासकिय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा. हा उपक्रम व्यापक पातळीवर जनसामान्यांना त्यांचा अधिकार व न्याय बाबत माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत असून सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दरवर्षी २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा या वर्षी २८ सप्टेंबर रोजी शनिवार व २९ सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने सदर माहिती अधिकार दिन २७ सप्टेंबर किंवा ३० सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात यावा या बाबत आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय असणाऱ्या तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयाने देखील माहिती अधिकार दिन साजरा करावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी केली आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक