भरपावसात शिवसेना ठाकरे गटाचे पोलीस प्रशासना विरोधात धरणे आंदोलन,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आश्वासनानंतर शिवसेनेचे धरणे आंदोलन मागे.

By : Polticalface Team ,23-09-2024

भरपावसात शिवसेना ठाकरे गटाचे पोलीस प्रशासना विरोधात धरणे आंदोलन,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आश्वासनानंतर शिवसेनेचे धरणे आंदोलन मागे.

करमाळा प्रतिनिधी

करमाळा पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेची अडवणूक होत असल्या बाबत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखाली आज भर पावसात सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात आले ,पोलीस प्रशासना विरोधात भर पावसात घोषणाबाजी करण्यात आली.

करमाळा पोलीस स्टेशन मध्ये सर्व सामन्या नागरींकाची अडवणूक केली जाते ठाणे अंमलदार बिट हवालदार अरेरावी करतात , करमाळा बसस्थानकावरून महिलांचे लाखो रुपयांचे दागिने व शुक्रवार बाजारातुन शेकडो लोकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत,यातील एकही आरोपी  

का सापडत नाहीत, ऊसवाहतुकदार यांच्या फसवणूक संदर्भात विशेष पथक नेमले जावे, अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत त्यांच्या पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते मात्र बेपत्ता मुलींचा तपास लागत इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

आंदोलन सुरू झाल्यानंतर पावसाला सुरवात झाली मात्र आंदोलन आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी सुरू केल्यानंतर  पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ आंदोलन स्थळी येवून आंदोलकांशी चर्चा केली. ठाणे अंमलदार बिट हवालदार यांना कडक सुचना करून सर्व सामान्य नागरिकांशी सौजन्य पुर्ण व्यवहार करण्याच्या सुचना दिल्या जातील, बसस्थानकावर कायम स्वरूपी पोलीस नेमले जातील, भुरट्या चोरांचा बंदोबस्त करू अल्पवयीन मुलींच्या पालकांना आम्ही धीर देत आहेत आमची दोन पथकं सातारा व गुजरात येथे गेली आहेत लवकरच सर्व गुन्ह्यांचा तपास केला जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिल्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख विजय माने ,युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, समन्वयक प्रसाद निंबाळकर, विभाग प्रमुख बालाजी वाडेकर, बिभिषण अडसूळ, शिवाजी नाईकनवरे, सोमनाथ पोळ, गटप्रमुख मयुर तावरे, शाखाप्रमुख ओंकार कोठारे, योगेश नगरे,शाखाप्रमुख आकाश सरडे, भाऊ मस्तुद,  शाखा प्रमुख दिंगबर काटुळे, डाॅ गणेश हाके, आदी उपस्थित होते.

या आंदोलनास प्रा रामदास झोळ सर,शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे, माजी नगरसेवक फारूक जमादार आदींनी पाठींबा दिला.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.