By : Polticalface Team ,23-09-2024
(प्रतिनिधी शफीक हवालदार ):
महा विकासआघाडीच्या उमेदवारी बद्दल श्रीगोंदा मतदार संघातून दावे प्रती दावे केले जात आहेत दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते राहुल जगताप यांनी मलाच उमेदवारी मीळणार असल्याचा दावा केला आहे तर आज शिवसेना नेते साजन पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेतली वप्रसार माध्यमांशी बोलताना साजन पाचपुते म्हणाले की महाविकास आघाडी बरोबर राहून श्रीगोंद्याची विधानसभा लढवणार शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेब व महाविकास आघाडी च्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उमेदवारी करणार असल्याचे साजन पाचपुते म्हणालेमहाविकास आघाडी एकत्रित असल्यास श्रीगोंदा विधानसभेसाठी ज्यांना कुणाला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे आपण करू अगर माजी आमदार राहुल जगताप यांना जर महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली तर मी व घनश्याम अण्णा शेलार आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळू परंतु मला जर महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाली तर घनश्याम अण्णा शेलार व राहुल जगताप यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळावा गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यातील काही नेते एमआयडीसी घोड व कुकडी च्या पाण्याच्या नावाखाली राजकारण करतात मला जर संधी मिळालीएमआयडीसी घोड व कुकडी चा प्रश्न मार्गी लावणार असल्याची साजन पाचपुते म्हणालेश्रीगोंदा मतदार संघातील विविध समस्यांचे निराकारण करण्यासाठी विशेषत तरुणांच्या रोजगारांच्या संधी वाढवण्यासाठी कटीबद्ध असल्याची साजन पाचपुते म्हणाले महाविकास आघाडीचा धर्म पाळत आणि पक्षाच्या निर्णयानुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला
वाचक क्रमांक :