By : Polticalface Team ,25-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. पुणे ता २५ सप्टेंबर २०२४ हवेली तालुक्यातील मौजे उरुळी कांचन ता हवेली जिल्हा पुणे येथील साने संगीत जनजागृती लोक कला मंच या ग्रुपचे प्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना माणदेशी तरंग.वाहिनी रेडिओ केंद्र मसवड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी रेकॉर्डिंग साठी रविवार दिनांक 22/09/2024 रोजी रेकॉर्डिंग करण्यासाठी बोलवण्यात आले होते. माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्र म्हसवड (ता.मान) जिल्हा सातारा नियोजित रेकॉर्डिंग कार्यक्रमा मध्ये उरुळी कांचन (ता. हवेली) येथील साने संगीत जनजागृती लोककला मंचला रेकॉर्डिंग करण्याची संधी मिळाली.
मानदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्राचे प्रमुख अध्यक्ष श्रीमती चेतना सिन्हा आणि रेकॉर्डिंग अनुप गुरव शिवाजी यादव सर त्यांच्या उपस्थित. साने संगीत जनजागृती लोककला मंच चे प्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे गायन वादन सादर करुन मानदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्रात रेकॉर्डिंग कार्यक्रम यशस्वी केला. या रेकॉर्डिंग कार्यक्रमा मध्ये प्रामुख्याने अभंग, गौळण ,भावगीत, लोकगीत, भक्तगीत, स्वच्छता, पाणलोट, भारुड, डेंगू, आरोग्य, लोकसंख्या वाढ, हुंडाबंदी, दारूबंदी, अंधश्रद्धा, जातीभेद, पर्यावरण, महापुरुष, देश भक्तीपर गीत ,पोवाडा, राष्ट्रीय सण, हिंदी मराठी गीत, बचत गट, स्त्रीभ्रूण हत्या, अशा अनेक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक लोक जनजागृती विषया वर साने संगीत जनजागृती लोककला मंच चे प्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे गायन वादन सादर करुन मानदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्रात रेकॉर्डिंग कार्यक्रम यशस्वी झाला असल्याची माहिती साने संगीत जनजागृती लोककला मंचाचे अध्यक्ष सचिव शिवराज साने यांनी सांगितले या प्रसंगी मानदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्राचे प्रमुख अध्यक्ष श्रीमती चेतना सिन्हा आणि रेकॉर्डिंग अनुप गुरव शिवाजी यादव सर यांच्या हस्ते साने संगीत जनजागृती लोककला मंचाचे अध्यक्ष सचिव शिवराज साने व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी मुला मुलींच्यामध्ये असणाऱ्या कला गुणांना वाव मिळाला पाहिजे यासाठी साने संगीत जनजागृती लोककला मंच यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले गायन वादन सुर संस्कार तसेच आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम परिक्षेत सहभाग नोंदवला घेण्याची संधी दिली जाते या मधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चित वाढल्या शिवाय राहत नाही अशी प्रतिक्रिया साने संगीत जनजागृती लोककला मंच चे अध्यक्ष शिवराज साने यांनी व्यक्त केली या वेळी साने संगीत जनजागृती लोककला मंचाचे लोक कलाकार. सोनाली सुकळे, रेखा साने संस्कृती अंधारे रिआन गाडीलकर देवयानी भजंनत्री अफान शेख पूर्वी ठाकरे संकेत खंडागळे वेदांत गायकवाड, ऋतुजा आवळे यशस्वी खंडारे आनंदी वाघमारे गोकुळ ठाकरे विकास साने वैष्णवी साळुंके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
वाचक क्रमांक :