येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय मामा शिंदे यांना निवडून आणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले करमाळा तालुक्यातील जनतेला आवाहन
By : Polticalface Team ,25-09-2024
करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी 3000 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांना निवडून आणा अधिक भरगच्च निधी तालुक्याचा विकास कामासाठी देऊ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
जनसंवाद यात्रे प्रसंगी झरे येथील कार्यालयात ते बोलत होते. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, या भागातील ऊस अनेक ठिकाणी जात आहे येथील दोन कारखाने मकाई व आदिनाथ बंद पडला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांना निवडून आणा या कारखान्याला योग्य ते सहकार्य भविष्यात केले जाईल. शेतकऱ्यांनी काळजी करू नका, लाडकी बहीण योजने मध्ये महिलांनी लाभ घ्यावा. विरोधक म्हणतात ही योजना बंद पडणार पण तसे होऊ देणार नाही. तुम्ही काळजी करू नका लाडकी बहीण योजनेची रक्कम वेळेतच तुमच्या खात्यावर पडेल.
राज्य शासनाने करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत 282.75 कोटी निधी असलेली विविध कामे, 34 कोटी 68 लाख निधी मंजूर असलेल्या करमाळा शहरातील नवीन प्रशासकीय इमारत तर करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत 271 कोटीच्या रस्ते कामांचा समावेश आहे. असे पवार यांनी सांगितले होते. यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे करमाळा तालुक्यातील दहिगाव योजना कुकडी योजना पिण्याचे पाण्याचे अडचणी वीज रस्ते असे अनेक कामे काही पूर्ण झाले आहेत, काही पूर्ण होत आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्यामुळेच 3000 करोड रुपयांचा निधी तालुक्याला मिळाला आहे. भविष्यातही दादांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होणार आहे.
यावेळी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा व प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन तर रस्ते कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खासदार सुनिल तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील, उप अभियंता कुंडलिक उबाळे, तहसिलदार शिल्पा ठोकडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे. उजनी जल पर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्या अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करमाळा येथे करण्यात आले.
तसेच करमाळा शहरातील विविध उपविभागीय कार्यालय तसेच तालुकास्तरीय कार्यालयांसाठी नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता होती. या इमारतीसाठी 34 कोटी 68 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन ही पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. त्याप्रमाणेच रस्ते विकास महामंडळ अंतर्गत हॅम (HAM)सावडी जिल्हा हद तालुका करमाळा ते वेणेगाव तालुका माढा या 71 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी 271 कोटी 55 लाखाचा निधी मंजूर असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करमाळा विधानसभा मतदारसंघातील असंख्य महिला गुलाबी कलरच्या फेटा घालून सभास्थळी उपस्थित होते. तसेच तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी सरपंच असंख्य उपस्थित होते.
चौकट
*महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार करमाळा दौऱ्यावर आले होते. तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा, महिला मेळावा यांना त्यांनी संबोधित केले. सकाळी 11 वाजता अजितदादा पवार यांचे हेलिकॉप्टरने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आगमन झाले होते. त्यानंतर श्री कमला भवानी देवी मंदिर येथे दर्शन घेऊन तेथून बाईक रॅली निघाली होती.
*एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हा सोलापूर अंतर्गत 282.75 कोटीच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ.
*करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत 271 कोटीच्या रस्ते कामाचा शुभारंभ
*करमाळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
* अजितदादा यांना झरे येथील सभा स्थळी धनगर समाज बांधवांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
* उपमुख्यमंत्री अजित पवार हे सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या निवासस्थानी आले असताना मराठा समाज बांधवांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.