जनतेचा विरोध डावलून शहराबाहेर प्रशासकीय इमारत बांधू देणार नाही!!टेंडर प्रक्रिया झालेली नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले भूमिपूजन हास्यस्पद!!

By : Polticalface Team ,25-09-2024

जनतेचा विरोध डावलून शहराबाहेर प्रशासकीय इमारत बांधू देणार नाही!!टेंडर प्रक्रिया झालेली नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले भूमिपूजन हास्यस्पद!! करमाळा (प्रतिनिधी ,,) शहराच्या मध्यवस्तीत सर्व जनतेला सोयीस्कर असलेली जागा उपलब्ध असताना व न्यायालय सह सर्व शासकीय कार्यालय जवळपास असणारी मध्यवस्तीतील जागा सोडून गावाबाहेर नवीन प्रशासकीय इमारत उभी करण्याचा प्रशासनाचा इरादा नागरिकांना मान्य नाही केवळ आमदार संजय मामा शिंदे यांच्या हट्टपायी ही इमारत शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे याला आमचा तीव्र विरोध असून कसल्याही परिस्थितीत मुख्य प्रशासकीय इमारत शहराच्या बाहेर बांधू देणार नाही वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन उभा करू असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे आज घाईघाईत करमाळा तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले मात्र या भूमिपूजन नंतर नागरिकांतून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे करमाळाचे नवीन प्रशासकीय इमारतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंजुरी दिली आहे ही इमारत आहे त्या ठिकाणीच उभी करावी अशी सर्व जनतेची मागणी असून अनेक संघटना व पक्षांनी याची निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत ही इमारत शहराबाहेर येण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असून या बांधकामाला मुख्यमंत्र्याकडून स्थगिती घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चिवटे यांनी दिली आहे ##### शेवट जनतेचे मत महत्वाचे असून संपूर्ण करमाळा तालुक्यातील जनता हे नवीन प्रशासकीय इमारत आहे त्या ठिकाणीच व्हावी अशी मागणी करत आहे असे असताना प्रशासन मात्र जागा अपुरी आहे असे कारण दाखवून तहसील कार्यालय व प्रशासकीय इमारत गावाबाहेर नेण्याचा अट्टाहास करत आहेत अजून या कामाचे टेंडर झालेले नाही तरीसुद्धा अजित पवार यांनी मी काम केले असं दाखवण्यासाठी केलेले भूमिपूजन हास्यस्पद आहे याबाबत आम्ही तहसीलदार ठोकडे यांच्याशी चर्चा केली असून नवीन जागेचा प्रस्ताव देत आहोत महेश चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर ##### या इमारतीसाठी अडीच एकर जागा लागते ही जागा जवळपास उपलब्ध झाले तर जागेचा प्रस्ताव बदलून देऊ जनतेचे मत विचारत घेऊ शिल्पा ठोकडे तहसीलदार करमाळा
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.