By : Polticalface Team ,26-09-2024
जनआधार न्युज महाराष्ट्र
सध्या बिग बॉस मराठी ५ च्या घरात निरनिराळे टास्क खेळले जात आहेत. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे आता सुरुवातीला चांगले असलेले सदस्य वाईट दिसू लागले आहेत. तर वाईट असलेले सदस्य चांगले दिसू लागले आहेत. या आठवड्यात सगळेच सदस्य घराबाहेर जाण्याच्या शर्यतीमध्ये नॉमिनेट झाले आहेत. आता पहिल्याच दिवशी वोटिंग ट्रेंडमध्ये कोण सगळ्यात वर आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर कोणता सदस्य घराबाहेर होणार हे या वोटींगवरून स्पष्ट दिसतंय. पाहा पहिल्या दोन दिवसात कोण पुढे आहे.
यावेळेस घरातील एकूण आठ सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत. सुरज चव्हाणला अजूनही घरातला गेम नीट कळलेला नाही. मात्र केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तो घरात टिकून आहे. प्रत्येक वोटिंगमध्ये चाहते त्याला भरभरून वोट करतात. त्यामुळे तो कायम पहिल्या क्रमांकावर असतो. मात्र शेवटच्या आठवड्यात सुरज पहिल्या क्रमांकावर नाहीये. पहिल्या क्रमांकावर आहेत पंढरीनाथ कांबळे. पॅडीला सगळ्यात जास्त वोट मिळाले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर सुरज आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त वोट मिळवणारी सदस्य आहे अंकिता प्रभू वालावलकर. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर. तर पाचव्या क्रमांकावर अभिजित सावंत आहे.
सध्या जान्हवीने अभिजीतला मागे टाकलं असं चित्र आहे. तर सहाव्या क्रमांकावर आहे धनंजय पवार आणि सातव्या क्रमांकावर आहे निक्की तांबोळी. तर या आठवड्यात सगळ्यात कमी वोट्स वर्ष उसगावकर यांना मिळाले आहेत. दोन्ही दिवस वर्षा या बॉटमला आहेत. त्यामुळे या आठवड्यात कदाचित निक्की आणि वर्षा यांच्यापैकी कुणी एक घराबाहेर होऊ शकतं. तर आठवड्याच्या शेवटी हे ट्रेंड्स बदलू शकतात
वाचक क्रमांक :