वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका शहर नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभ संपन्न*

By : Polticalface Team ,27-09-2024

वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका शहर नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभ संपन्न*

जनआधार न्युज प्रतिनिधी.भिमसेन जाधव :दि.26/09/2024 आज दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका व शहर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता व त्याच अनुषंगाने वंचित बहुजन युवा आघाडीकडून इंदापूर शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात इंदापूर शहरात बाईक रॅली काढून करण्यात आली. या बाईक रॅलीमध्ये इंदापूर तालुक्यातील अनेक युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. बाईक रॅलीची सुरुवात इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहापासून झाली. शहरांमधील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत संपूर्ण शहरामध्ये फेरी मारण्यात आली. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, तथागत गौतम बुद्ध, अहिल्यादेवी होळकर इत्यादी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर इंदापूर शहर शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका व शहर पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. ऋषिकेश भाऊ नांगरे पाटील (वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य तथा पुणे जिल्हा निरीक्षक) व मा.विशाल भाऊ गवळी (वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य) व मा.मंगलदास भाऊ निकाळजे (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व) हे लाभले होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा.प्रतीक चव्हाण (जिल्हा महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व) मा. गणेश थोरात (उपाध्यक्ष पुणे जिल्हा पूर्व) मा.कृष्णा साळुंखे (सहसचिव पुणे जिल्हा पूर्व), मा.विनय दामोदर (वंचित बहुजन आघाडी बारामती शहर सचिव) इत्यादी उपस्थित होते. यामध्ये सर्वप्रथम पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी सर्व वंचित घटकांपर्यंत पोहोचून तळागाळातील लोकांची कामे करून लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आवाहन करत पक्ष वाढवण्याचे आव्हान केले व वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य विशाल भाऊ गवळी यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करत पक्ष संघटनाचे काम मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य तथा पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश भाऊ नांगरे पाटील यांनी संपूर्ण तालुक्यात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून पक्ष वाढीसाठी काम करण्याचे तसेच येणाऱ्या विधानसभेत आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल यावर मार्गदर्शन करत पक्ष संघटन वाढवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमांमध्ये इंदापूर तालुका अध्यक्ष पदी किर्तीकुमार वाघमारे तर महासचिव पदी सोमनाथ खानेवाले व शैलेश सोनवणे यांची निवड करण्यात आली तर इंदापूर शहर अध्यक्षपदी निलेश मखरे व महासचिव पदी निलेश सरतापे यांची निवड करण्यात आली व संपूर्ण तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना इंदापूर तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी केली तर पुणे जिल्हा पूर्व महासचिव प्रतीक चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे व संपूर्ण कार्यकारणी यांनी केले होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी