बारामतीचा माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक...नगरपालिकेला पाच कोटींचे मिळणार पारितोषिक

By : Polticalface Team ,30-09-2024

बारामतीचा माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक...नगरपालिकेला पाच कोटींचे मिळणार पारितोषिक जन आधार न्युज भिमसेन जाधव: बारामती: माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत बारामती नगरपालिकेस नगरपरिषद व नगरपंचायत विभागात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या मुळे बारामती नगरपालिकेस पाच कोटी रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या बाबत माहिती दिली. 1 एप्रिल 2023 ते 1 मे 2024 या काळात माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील 414 नागरी संस्था व 22218 ग्रामपंचायती अशा 22632 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदविला होता.या मध्ये 50 हजार ते एक लाख लोकसंख्या गटविभागात बारामती नगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तीन वर्षांपूर्वी बारामती नगरपालिकेचा क्रमांक तळामध्ये होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या नंतर या अभियानामध्ये बारामतीचा क्रमांक वरचा कसा येईल या दृष्टीने प्रयत्न केले. तीन वर्षात नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व त्यांच्या टीमने अथक परिश्रम करत आज राज्यात प्रथम क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. दरम्यान बारामती नगरपालिकेस बक्षीसाच्या मिळणा-या पाच कोटी रुपयांच्या रकमेचा विनियोग निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी करावा लागणार आहे. वृक्षसंवर्धन, रेनवॉटर हार्वेस्टींग, जलसंवर्धन, सौरउर्जेला प्रोत्साहन अशा कामांसाठी या पारितोषिकाची रक्कम नगरपालिकेला खर्च करता येणार आहे. पारितोषिकाची निम्मी रक्कम नगरपालिकेला तातडीने मिळणार असून उर्वरित रक्कम विनियोगाचा प्रकल्प अहवाल सादर करुन शासनाची त्यास मान्यता मिळाल्यानंतर मिळेल.बारामती नगरपालिकेच्या सर्वच विभागांनी या अभियानात मनापासून काम केले, नागरिकांनीही या प्रयत्नांना साथ दिली, सातत्याने शहर स्वच्छतेसह इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. एक स्वच्छ, सुंदर व हरित शहर म्हणून बारामतीची ओळख राज्यभर झालेली असून आता या राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने या वर शिक्कामोर्तब झालेले आहे. मुख्याधिका-यांचे परिश्रम महत्वाचे ठरले... या अभियानात मुख्याधिकारी महेश रोकडे व त्यांचे सर्व विभागप्रमुख, स्वच्छतेची जबाबदारी असलेली एनडीके कंपनी, सर्व कर्मचारी व स्वच्छतादूत यांच्यासह बारामतीकरांनी दिलेले योगदान महत्वाचे ठरले. मुख्याधिका-यांनी केलेले सूक्ष्मनियोजन व स्पर्धेच्या दृष्टीने केलेली तयारी या मुळे बारामतीचा राज्यात प्रथम क्रमांक आला. राष्ट्रीय स्तरासाठी आता प्रयत्न.... देशातील म्हैसूर व इंदौर या दोन शहरांनी स्वच्छता अभियानात राष्ट्रीय स्तरावर जे सातत्य ठेवलेले आहे, त्या शहरांना भेट देत पाहणी करुन बारामती शहराचा नावलौकी राष्ट्रीय स्तरावर कसा नेता येईल याचा भविष्यात प्रयत्न करणार आहोत- महेश रोकडे, मुख्याधिकारी, बा.न.प, बारामती.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.