By : Polticalface Team ,02-10-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन चेस क्रीडा स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा टी.वाय.बी.बी.ए. चा विद्यार्थी शुभम बाळेश्वर गुंड याची आंतर विभागीय चेस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच विराज शिंदे याने अंतिम फेरीपर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शा. शि .संचालिका कल्पना बागुल आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :