By : Polticalface Team ,02-10-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- जोपर्यंत आई-वडिलांचा श्वास सुरू आहे. तोपर्यंत त्यांच्या श्वासाला जीव लावा; प्रेम करा आईबाप देहलोकी गेल्यानंतर त्यांचे फोटो भिंतीवरून खाली येऊ शकणार नाहीत असे भावनिक उद्गार प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी आयोजित व्याख्यानमालेत बोलताना काढले.
लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा येथील श्री व्यंकनाथ विद्यालय मित्र प्रेम ग्रुप व वसुंधरा ग्रुप लोणी व्यंकनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती सौ संध्याताई जगताप ह्या होत्या. स्वागत व्यंकनाथ विद्यालयाचे प्राचार्य आनंद पुराने सर यांनी केले.
यावेळी उपस्थितांसमोर आई- वडील -मुले -मुले यांच्या नात्यातील सुंदर व्याख्या सांगताना प्रा हंकारे पुढे म्हणाले की; आई ही विश्वाची जननी आहे. जन्म देताना आईला किती वेदना होत असतात. ज्यावेळी आई मुला मुलींना जन्म देते त्यावेळेस माझे मूल वाचले पाहिजे ही तळमळ आईची असते. परंतु तेच मुले- मुली पुढे सज्ञान झाल्यानंतर आई-वडिलांची आज्ञा; संस्कार याला तिलांजली देतात. मुलींनी आईबाप समजून घेताना जन्मापासून ते आपण सज्ञान होईपर्यंत मागे वळून पाहण्याची आवश्यकता आहे; माझी मुले- मुली उच्च शिक्षणातून अधिक ज्ञान होऊन मोठे झाले पाहिजे. ही अपेक्षा असते. परंतु अलीकडे मात्र संस्कार या शब्दाला अर्थ दिसून येत नाही. अनेक मुली त्या विघ्न संतोषी मुलांशी परस्पर विवाह करून आई-वडिलांनी माझी मुलगी गायब आहे; अशी तक्रार पोलिसात देताच. त्यावेळेस मुली मात्र चौकशीच्या साक्षी वेळी मला आई-वडिलांपासून माझ्या जीवितास धोका आहे अशा प्रकारे साक्षी नोंदवतात घृणास्पद जबाब देतात. त्यावेळेस मात्र आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते. असे सांगत हंकारे आणखी पुढे म्हणाले की त्यावेळेस किती यातना या माय बापाला होत असतील हे देखील जाणून घेण्याची आवश्यकता आहे. पर्यायाने आई-वडिलांना या मुला मुलींच्या दुर्गुणांमुळे आपला जीव गमावा लागतो ही मोठी शोकांतिका असल्याचे प्रा हंकारे यांनी यावेळी भावनिक दृष्ट्या होत सांगितले.
पुढे बोलताना प्रा हंकारे आणखी म्हणाले की; आई म्हणजे वाघीण आहे. मुलींनी देखील वाघिणीच्या पोटी जन्म घेतला आहे. हे ध्यानात घ्यावे. त्यामुळे मुलींनी जरी एखाद्या मुलाने अमिष दाखवले; छेडले तर त्याला वाघिणीचे रूप दाखवण्याची आवश्यकता आहे. असे सांगत श्री हंकारे यांनी जिजाऊ माता; सावित्रीबाई फुले; झाशीची राणी; अहिल्यादेवी होळकर इत्यादी मातांचे संस्कार व त्यांच्या पोटी जन्मलेली मुले ही किती शूरवीर होती; त्यांचे विचार देखील आपण अंगीकारत नाही. त्यांचे विचार जर आपण अंगीकारले तर शत्रूला नामोहरम करण्याची ताकद मुलींनी दाखवण्याची आवश्यक आहे. त्यामुळे आई वडील असेपर्यंत त्यांच्यापुढे फालतू हट्ट धरू नका आई-वडिलांनी आपल्यावर योग्य संस्कार करत बालपणी माया; प्रेम; जिव्हाळा; आपुलकी व हरतरेचे हट्ट पुरवले. परंतु आपण ज्या वेळेस सज्ञान होतो. त्यावेळेस मात्र आई-वडिलांच्या संस्काराला तिलांजली देत त्यांची आज्ञा पाळत नाहीत. वृद्धापकाळात त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. त्यामुळे प्रत्येक मुला मुलींनी आई वडील समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे भावनिक गौरवदगार प्रा हंकारे यांनी माता-भगिनींच्या समोर विद्यार्थी विद्यार्थिनींना कान मंत्र दिला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा हंकारे यांनी उपस्थित वडिलांच्या समोर मुलींना उभे करत शपथ देत आपल्या जन्मदात्या वडिलांना मिठी मारत माझ्याकडून आई-वडिलांचा अपमान होणार नाही; चारित्र्याला डाग लावून घेणार नाही अशा प्रकारे शपथ देत मुलींच्या डोळ्यातून अक्षरशा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे उपस्थित माता-भगिनींना देखील अश्रू अनावर झाले.
या कार्यक्रमाचे आयोजक गणेश काकडे; राहुल गोरखे; भास्कर कुदांडे आदींनी या कार्यक्रमासाठी मोठे परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास युवा नेते दिग्विजय नागवडे; कारखान्याचे संचालक डीआर काकडे; रावसाहेब काकडे; दिलीप काकडे; मोहनराव काकडे; पोलीस पाटील मनेश जगताप; सरपंच मनीषाताई नहाटा; गणपतराव काकडे; विलासराव काकडे; पुरुषोत्तम लगड; खंडेराव काकडे; बाळासाहेब शेंडे; मधुकर पवार; हनुमंत मगर; ज्ञानदेव मगर; बाळासाहेब थोरात; नीलिमा थोरात; बंडू खंडागळे; प्राचार्य पुराने सर; विद्यार्थी; विद्यार्थिनी; माता; पिता आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले
वाचक क्रमांक :