By : Polticalface Team ,02-10-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सौ अनुराधाताई नागवडे प्रतिष्ठान आयोजित जन आशीर्वाद यात्रेस नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दौऱ्यानिमित्त मोठा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सौ अनुराधाताई नागवडे यांचा जनसंवाद व जन आशीर्वाद हा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी प्रेरणादायी दौरा ठरताना दिसतो आहे. त्यामुळे सहकार महर्षी दिवं शिवाजीराव नागवडे बापू यांनी श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला पूर्वपदावर आणण्यासाठी सहकार; शिक्षण; कृषी; सिंचन या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. अशा प्रकारे उज्वल भविष्य मिळवून दिले. सर्वसामान्य जनता; कष्टकरी; शेतकरी आणि नागवडे कुटुंबीयांचे गेल्या 60- 65 वर्षापासून अतूट नाते आहे. ते फक्त बापूंच्या सत्य आणि निष्ठेमुळेच टिकून आहे. सहकार महर्षी बापूंनी सत्तेपेक्षा समाजसेवेला अधिक महत्त्व देण्याचा अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. प्रसंगी सत्ता असो वा नसो बापूंनी आपल्या स्वतःच्या कुटुंबापेक्षा सर्वसामान्यांना अधिक न्याय देण्याचा प्रामणिक प्रयत्न केला .तोच वारसा बापूंच्या नंतर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे या खंबीरपणे चालवतात. बापूंचे तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी अधुरे राहिलेले स्वप्न सौ अनुराधाताई नागवडे यांनी पूर्ण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेनिमित्त प्रत्येक गावांमध्ये नागवडे कुटुंबातील राजेंद्र दादा नागवडे; सौ अनुराधाताई नागवडे; दीपक शेठ नागवडे; पृथ्वीराज नागवडे; दिग्विजय नागवडे हे सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्येक जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
सौ अनुराधाताई नागवडे यांच्या भेटीदरम्यान अनेक सर्वसामान्य माणूस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नागवडे कुटुंबातीलच आमदार हवा. अशा भावना व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महिला आमदार म्हणून तालुक्यात सौ अनुराधाताई नागवडे यांना अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 35 वर्षांमध्ये सत्ता असल्याने तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. नागवडे कुटुंबांनी मात्र सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू म्हणून तालुक्याच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान दिलेले आहेत. याची जाणीव सर्वसामान्य जनतेला निश्चित झालेले दिसते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सौ अनुराधाताई नागवडे तुम्हीच आमदार असणार अशा भावना देखील सर्वसामान्य नागरिक; शेतकरी; कष्टकरी; कामगार इत्यादी कडून होताना दिसते. त्यामुळे नागवडे कुटुंबाशी एकनिष्ठ असणाऱ्या नगर श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनीच स्वतः प्रचाराची धुरा अंगावर घेऊन कसल्याही परिस्थितीत सौ अनुराधाताई नागवडे यांना आमदार करायचे असा ठाम निर्धार घेतल्याचे नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
सौ नागवडे यांच्या जनसंवाद यात्रेनिमित्त नगर श्रीगोंदा मतदारसंघात भेटीदरम्यान सौ अनुराधाताई नागवडे यांचे जल्लोषात स्वागत करून औक्षण देखील करण्यात येत आहे. दरम्यान हा जनसंवाद आणि जन आशीर्वाद कशासाठी? हे नागवडे समर्थक व त्यांचे कार्यकर्ते यांनी म्हटले आहे की; वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न कायमचे सोडवण्यासाठी; पाणी प्रश्न कायमचा मार्गी सोडवण्यासाठी; रस्त्यांची समस्या दूर करण्यासाठी; एमआयडीसीचा निर्धार करण्यासाठी; गावोगावी लालपरी अर्थात एसटी पोहोचण्यासाठी; बेरोजगारांना रोजगार भेटण्यासाठी; शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी; बळीराजाला दिलासा देण्यासाठी; शेतीमालाच्या हमीभावाची लढाई लढवण्यासाठी; युवक युवतींसाठी दर्जेदार व उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी; महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी; सीमेवर लढणारे आजी-माजी सैनिक वीर पत्नी मातांच्या सन्मानासाठी; अपंग बांधवांना मदत व प्रोत्साहन देण्यासाठी; खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी; आरोग्य सेवेची हमी देण्यासाठी; शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी; बचत गटांच्या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी; ज्येष्ठांचा आणि मायमाऊल्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी; लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी; पाच दशकांचा जिव्हाळा जपण्यासाठी; आपल्या लोकांशी व आपल्या मायमाऊलींना भेटण्यासाठी; प्रामाणिक व निष्ठावंतांशी मनमोकळ बोलण्यासाठी; नागवडे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकांचे आशीर्वाद घेण्यासाठी; आपुलकी प्रेम आणि जिव्हाळा जपण्यासाठी या सर्व प्रश्नांवर उत्तर मात्र एकच फक्त सौ अनुराधाताई नागवडे हेच सर्वसामान्यांसमोर येत आहे. नगर श्रीगोंदा मतदारसंघातील सर्वसामान्य व्यक्ती देखील सौ अनुराधाताई नागवडे यांनाच आमदार म्हणून पसंती असल्याचे भेटीदरम्यान बोलून दाखवतात असे मतदारसंघात प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे सौ अनुराधाताई नागवडे यांचा दौरा हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वाचक क्रमांक :