कर्मवीरांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिलीसुप्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे

By : Polticalface Team ,02-10-2024

कर्मवीरांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिलीसुप्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे श्रीगोंदा (प्रतिनिधी): कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या या रयत शिक्षण संस्थेने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या बोधवाक्यामुळे रयतेमधून नव्या युगाचे स्वावलंबी विद्यार्थी घडत आहेत. शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्याचे काम करावे. त्यातूनच आपली ओळख तयार होईल. विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करून मोठे व्हावे, असा विचार गणेश शिंदे यांनी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये रयत संकुलाने आयोजित केलेल्या कर्मवीर जयंती समारंभात व्यक्त केला. अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी मंत्री, आ.बबनराव पाचपुते होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ घ्यावा. यशस्वी व्हा. असा विचार त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले की, रयत शिक्षण संस्था ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था आहे. गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना घडवणारे विचार व्यक्त केले त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. प्रास्ताविक व स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी केले. अहवाल वाचन प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी केले.अंकुर भितीपत्रिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालय विभागाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पीटर रणसिंग यांच्यातर्फे निवडक गरीब विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महावीर पटवा, उद्योगपती विजय मचे,कुंडलिकराव दरेकर ,रवीशेठ दंडनाईक, रत्नप्रभा बोरुडे, जयश्रीताई दरेकर, श्रीमती वामन मॅडम, मुख्याध्यापिका गीता चौधरी, ज्योत्स्ना भंडारी, सुनील पाचपुते,पिटर रणसिंग, मिलिंद दरेकर, पंडितराव अनभुले, आर.डी. लोखंडे, व उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, शिक्षणप्रेमी नागरिक विद्यार्थी -विद्यार्थिनी, रयत संकुलाचे सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शरद साळवे यांनी केले. आभार प्रा. शहाजी मखरे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी